yeola band.jpg 
नाशिक

'त्या' महिलेच्या संपर्कातील ६ जणांना नाशिकला हलवले.. येवल्यात ३० क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / येवला : रविवारी (ता. 26) रात्री शहरातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे येवलेकरांत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. प्रशासनही सतर्क झाले असून, विविध 30 संशयितांना क्वारंटाइन केले आहे, तर त्या महिलेच्या संपर्कातील सहा जणांना नाशिकला तपासणीसाठी हलविले आहे. 

बाधितांमध्ये चार बालकांचा समावेश; सहा जणांना नाशिकला हलविले 
येथे रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारी रात्री आदेश काढून उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे यांची येथील रिक्त प्रांताधिकारीपदी नियुक्ती केली. त्यांनी सोमवारी (ता. 27) दुपारी तहसील कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे, तहसीलदार रोहिदास वारुळे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, पोलिस निरीक्षक संदीप कोळी व अनिल भवारी, वैद्यकीय अधिकारी शैलजा कुप्पास्वामी व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रांत कावरे यांनी नियोजनाची माहिती दिली. शुक्रवारी शहरातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नऊ हाय रिस्क रुग्ण नाशिकला दाखल केले होते. यातील पाच पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये चार बालके असल्याची माहिती प्रांतांनी दिली. या महिलेच्या परिसरातील जी कुटुंबे घराला कुलूप लावून शुक्रवारी पसार झाली होती त्या कुटुंबांचा तपास प्रशासनाने लावला असून, यातील 30 जणांना आरोग्य विभागाने घरातच विलगीकरण केले आहे. या 30 जणांची दररोज आरोग्य विभागामार्फत माहिती घेतली जाणार आहे. 

येवल्यात 30 संशयितांचे विलगीकरण 
हाय रिस्क व लो रिस्क रुग्णांचा मंगळवारी सकाळी अकरापासून शहरात सर्व्हे होणार असून, कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे तत्काळ संस्थात्मक विलगीकरण व घरातील विलगीकरण या संदर्भात निर्णय घेऊन त्याचा दैनंदिन अहवाल पाठविण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले. पालिकेला नियमित शहरात सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना दिल्या असून, बुधवारपासून घरपोच अत्यावश्‍यक सेवा देण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रांतांनी दिली. पोलिस प्रशासनाला लॉकडाउन संदर्भात मालेगाव येथून तसेच बाहेर जिल्ह्यांतून अत्यावश्‍यक सेवा वगळता कुणालाही शहरात प्रवेश न देण्याच्या सूचना दिल्याचेही प्रांत कावरे यांनी सांगितले. 

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

खासगी डॉक्‍टरवर मनमानीचा आरोप 
सावरगाव येथील एक कर्मचारी येवल्यातील त्या खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला असून, संबंधित कोरोनाबाधित महिलेच्या सान्निध्यात आला होता. या कर्मचाऱ्याला तालुका पोलिस डॉक्‍टरांनी होम क्वारंटाइन करूनही संबंधित खासगी डॉक्‍टरने या कर्मचाऱ्याला स्वतःच्या वाहनातून येवल्यात नेऊन हॉस्पिटलमध्ये डांबले आहे. यातून डॉक्‍टरची मनमानी दिसून येत असल्याने कर्मचाऱ्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास संबंधित खासगी डॉक्‍टर जबाबदार राहतील, असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT