vegetable market.jpg 
नाशिक

धक्कादायक! क्वारंटाईन झुगारून महिला भाजी मंडईत पोहचते तेव्हा....परिसरात खळबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / म्हसरूळ : कोरोना संकटाच्या काळात शहरात आणखी एक धक्कादायक घटना रविवारी (ता. 12) पुढे आली. यात म्हसरूळ येथील एका क्वारंटाइन असलेल्या कुटुंबातील एक महिला चक्क भाजी बाजारात भाजी विक्री करताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

काय घडले नेमके?

कोरोना संकटाच्या काळातील या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. म्हसरूळ गाव परिसरात दोन दिवसांपूर्वी एका कुटुंबातील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. संबंधित महिलेवर सध्या महापालिकेच्या झाकिर हुसेन रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असून, त्यांचे संपूर्ण कुटुंब चौदा दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही या कुटुंबातील एक महिला रविवारी (ता. 12) चक्क मंडईत भाजी विक्रीसाठी आल्याचे आढळले. विशेष म्हणजे, संबंधित कुटुंबीय राहात असलेला भाग मनपा व पोलिस प्रशासनाने प्रतिबंधित म्हणून सील केलेला आहे. मात्र, अशा बिकट परिस्थितीत उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधनच नसल्याने सकाळी अकराच्या सुमारास ही महिला नाईलाजाने म्हसरूळच्या भाजी विक्री करण्यासाठी आली.

भाजी मंडई नियोजन कक्षापर्यंत ही वार्ता पोचताच, या महिलेला सूचना देऊन घरी पाठविण्यात आले. तसेच, मनपाचे आरोग्य पथक व पोलिस पथकाच्या सहाय्याने संबंधित महिलेच्या घरी व परिसरातही आवश्‍यक सूचना देण्यात आल्या. म्हसरूळ भाजी मंडई नियोजन कक्षाचे अधिकारी भूषण देशमुख, प्रकाश उखाडे, म्हसरूळचे पोलिस उपनिरीक्षक श्री. पवार, कॉन्स्टेबल श्रीमती टोंगारे, मनपाच्या मदतीसाठी असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरी नाशिक-2 च्या पुष्पा वडजे आदींनी या सूचना दिल्या.

उत्पन्नाचे साधनच हिरावले गेले म्हणून...

कुटूंबातील सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कुटूंबच क्वारंटाईन झाले. परिसरही प्रतिबंधित झाला. परिणामी उत्पन्नाचे साधनच हिरावले गेले. अशा परिस्थितीत दुसरा पर्यायच न उरल्याने म्हसरूळ येथील एका महिलेने क्वारंटाईन झुगारून थेट मंडईत येऊन आपला मुळ भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT