question about Police personnel involved in shooting in Wadala area nashik news 
नाशिक

Nashik Crime: वडाळा भागातील गोळीबारात पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश?

सिडकोमधील गोळीबाराच्या घटनेच्या दोन दिवसांनीच हा प्रकार झाल्याचे समोर येत असल्याने घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत वडाळा येथील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या म्हाडा बिल्डिंग परिसरात १५ डिसेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास गोळीबार झाल्याची आणि यात तत्कालीन पोलिस आयुक्तांनी स्थापन केलेल्या पोलिसांच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्याचाच समावेश असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाल्याने पोलिस विभाग हादरला आहे.

सिडकोमधील गोळीबाराच्या घटनेच्या दोन दिवसांनीच हा प्रकार झाल्याचे समोर येत असल्याने घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. (question about Police personnel involved in shooting in Wadala area nashik news)

त्या दिवशी चार ते पाच जणांच्या टोळक्यांपैकी एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याचे समजते. त्या गोळीबाराच्या घटनेबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नव्हता. याच कारणावर शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी पुन्हा वडाळा व पाथर्डी परिसरात संशयितांमध्ये बाचाबाची झाल्याने तो गोळीबार झाल्याची माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्यात पोचली.

घटनेचे गांभीर्य बघून पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख हेदेखील पोलिस ठाण्यात पोचले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

यात पोलिस कर्मचाऱ्यांचाच समावेशासंदर्भात उपायुक्त राऊत यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, की याबाबत सखोल चौकशी चालू असून, कुणी, कसा व कुठे गोळीबार केला हे तपासले जात आहे. सकाळपर्यंत याबाबत सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर रीतसर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, रात्री सव्वादहाच्या सुमारास म्हाडा बिल्डिंगजवळ अज्ञात दहा-पंधरा जणांनी जात तेथे दमबाजी करत या प्रकरणात कुणी काही साक्ष दिली तर आमच्याशी गाठ आहे, असा दम दिल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Video

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

SCROLL FOR NEXT