merchant Qutbuddin Sheikh distributing free sugar to the poor in the city without any publicity esakal
नाशिक

Nashik : रद्दीवाले कुतुबुद्दीन यांनी दिवाळीत वाटली 10 टन साखर

संपत देवगिरे

नाशिक : ते राजकारणी नाहीत. त्यांना निवडणूक लढवायची नाही. केलेल्या कामाचा प्रचारही नको आहे. त्यांचे नाव आहे कुतुबुद्दीन शेख. व्यापार रद्दीचा. मात्र, त्यांच्या कामापुढे सोन्याची चमक फिकी पडावी अशी. श्री. शेख यांनी गरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी चक्क दहा टन साखर मोफत वाटली. त्यांचा हा उपक्रम गाजावाजा न करता दहा वर्षे सुरू आहे.

शहरातील गंजमाळ हा झोपडपट्टी, गरीब व हातावर पोट असलेल्यांचा परिसर. बुधवारी (ता. २६) सायंकाळी येथे गरीब महिला, नागिरकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. अनेकांना त्याचे कुतुहल वाटले. मात्र, काय सुरू आहे हे कळत नव्हते. (Raddiwale Qutubuddin distributed 10 tons of sugar during Diwali Nashik Latest Marathi News)\

या गर्दीत गेल्यावर जे पाहिले त्याने माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. कुतुबुद्दीन शेख रद्दीचे व्यापारी आहेत. ते त्यांच्या दुकानावर गरिबांना प्रत्येकी कुटुंबासाठी पाच किलो साखर मोफत वाटप करीत होते. कोणताही गाजावाजा नाही. गडबड व गोंधळ नाही, तसेच प्रचारही नाही. सर्व शांततेत सुरू होते. स्वतः श्री. शेख, त्यांचे चिरंजीव रझ्झाक शेख व अन्य सहकारी त्यांना त्यांच्या कामात मदत करीत होते. समोरच खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यालय असल्याने त्यांनी गोडसे यांनाही निमंत्रित केले होते. सर्व मिळून प्रकाशाच्या उत्सवात गरिबांच्या जीवनात साखरेचा गोडवा पेरत होते. घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्याचे प्रतिबिंब उमटत होते.

श्री. शेख यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ही तर सेवा आहे. त्याचा काय प्रचार करायचा. कशाला माहिती द्यायची, ही त्यांची प्रतिक्रिया होती.
याबाबत त्यांचे चिरंजीव रझ्झाक शेख म्हणाले, की आमचे वडील समाजसेवा म्हणून हे काम करतात. यात कोणताही भेदभाव, धर्माचा अडसर नसतो. गेली दहा वर्षे ते दिवाळीला दहा टन साखर वाटतात. एका कुटुंबाला पाच किलोचे पाकीट दिले जाते. रमझान ईदला ते गरीब समाजबांधवांना प्रत्येक निश्चित रक्कम देतात. जे जे येतील त्याला मदत केली जाते. त्याची मोजदाद ठेवली जात नाही. गेली दहा वर्षे दिवाळी आणि ईदला हा उपक्रम सुरू आहे.

खासदार गोडसेंची चर्चा

दिवाळीत या रांगा पाहिल्यावर त्याचे राजकारण न झाले तरच नवल. शेख यांच्या दुकानासमोरच शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचे संपर्क कार्यालय आहे. त्यामुळे या रांगा पाहिल्यावर एका राजकीय नेत्याने गोडसे साखर वाटत आहे, असे कळविले. याबाबत खासदार गोडसे यांच्याशी संपर्क केल्यावर, ‘मी नाही तर रझ्झाकभाई हे काम करतात. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे’ असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT