Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : ठाणगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : ठाणगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी (Police) चार लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. जुगार खेळणा-यानां सहा जणांना अटक करण्यात येऊन त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.(raid on gambling den in Thangaon Mobile phone 2 wheeler lakh rupees seized from 6 people nashik crime news)

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदया विरोधात मोहीम राबविण्यात येत असताना ठाणगाव हद्दीतील खंडोबा मंदिराजवळ असलेल्या ज्ञानेश्वर बंधारा येथील एका घराच्या आडोशाला पैसे लावून काहीजण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पथकास समजली होती.

त्यानुसार पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली हवालदार गोरक्षनाथ संवत्सरकर, विनोद टिळे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दोन पंचांसह पोलिसांनी घराच्या भिंतीच्या आडोशाला पाच ते सात जणांवर छापा टाकला.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

त्यांच्याकडून एक लाख ६५० रुपये रोख, सहा मोबाईल फोन, पाच दुचाकी असा सुमारे चार लाख 69 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल सापडला. पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या बाळासाहेब नथू जगताप (52), सूर्यभान किसन शिंदे (47), मयूर बाबुराव शिंदे (25),

विलास भाऊसाहेब आव्हाड (38), मच्छिंद्र दशरथ शिंदे (42), अमोल कमलाकर आव्हाड (26) यांना पोलिसांनी अटक केली. हवालदार गोरक्षनाथ संवत्सरकर यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT