Hookah Parlour esakal
नाशिक

Nashik Crime News : इंदिरानगरच्या ‘पेरूच्या बागे’त हुक्का पार्लरवर छापा

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : अवैधरीत्या हुक्का साहित्य व अमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी इंदिरानगर भागातील गुरुगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या पेरूची बाग येथे अमलीपदार्थ विरोधी विशेष पथकाने कारवाई केली.

यात हुक्का पिण्याचा हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर आदी १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आणि साहित्य जप्त करण्यात आले. (Raid on hookah parlor in Peru Chi Baag of Indiranagar Nashik Crime News)

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या अमलीपदार्थ विरोधी विशेष पथक अवैधरीत्या अमलीपदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत आहे. उपनगर पोलिस ठाणे, हद्दीतील वडाळा पाथर्डी लगत असलेल्या हॉटेल द पेरू फार्म येथे पथकातील अंमलदार यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर येथे कारवाई करण्यात आली.

संशयित नितीन शांताराम आहिरे (२६, मॅनेजर, रा- पेरूची बाग, इंदिरानगर नाशिक), शंकर राजाराम पांगरे (३०, हॉटेल मालक, रा- टाइम ब्लॉसम अपा. चौथा मजला, पांगरे मळा, बडदेनगर, नाशिक) यांना येथून ताब्यात घेवुन त्यांच्याकडून उपरोक्त मुददेमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

हॉटेलमध्ये स्मोकिंग झोन नसलेल्या ठिकाणी विनापरवाना बेकायदा हुक्का बार चालवून, प्रतिबंधित हुक्का ग्राहकांना सेवनासाठी जागा उपलब्ध करून देवून हुक्याची साधने व प्रतिबंधितच तंबाखूजन्य पदार्थ पुरवली व हॉटेलमध्ये सात इसम हे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना मिळून आले.

त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. सदर कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एच. के. नागरे आणि सहकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT