Broken bearing of middle coach wheel of Janshatabdi Express. esakal
नाशिक

Nashik News : मनमाडला रेल्वेच्या चाकात बिघाड; अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : जालण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या मधल्या डब्याचे चाकाच्या बेअरिंगमध्ये बिघाड झाल्याची घटना गुरुवारी (ता.२९) मनमाड रेल्वे स्थानकावर घडली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने गाडी थांबविण्यात आली. रेल्वे कर्मचार्यांनी तातडीने कपलिंगचे काम पूर्ण केले.

फलाटावरच हा प्रकार घडल्यामुळे पुढील होणारा अनर्थ आणि मोठा अपघात टळल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Railway wheel failure Disaster averted at manmad Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी मनमाड रेल्वे स्थानकावरून दुपारी अकराला आली असता गाडीत बिघाड झाल्याचे लक्षात आले. गाडीच्या मधल्या डब्याच्या चाकाला बाहेरच्या बाजूने असलेली बेअरिंगमध्ये बिघाड झाला होता. गाडीच्या घर्षणामुळे चाक तापल्याने बिघाड बेरींग मध्ये हा बिघाड झाला होता.

या बिघाडामुळे गाडीला झटका बसत होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ चाक खोलून काम पूर्ण केले. त्यानंतर हा बिघाड झालेला डबा बाजूला काढण्यात येऊन दोन तासांनी काम पूर्ण झाल्यावर गाडी मनमाड रेल्वे स्थानकातून रवाना झाली. रेल्वे स्थानकात हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT