rain update news esakal
नाशिक

Rain Update News : गरब्याच्या उत्साहावर कडकडाटासह परतीची मुसळधार!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोकण, मध्य, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यांत आजपासून तीन दिवस विजांसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवीत आज शहर- जिल्ह्यात दुपारी १. ८ मि.मी. वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावत नवरात्रोत्सवाच्या आनंदावर बरसत जनजीवन विस्कळित केले.

उद्या (ता.३०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवातील दांडियावर परिणाम होणार आहे. आज दुपारी सव्वा ते दीडच्या सुमारास शहर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी नवरात्रोत्सव मंडळांनी उभारलेल्या मंडपात रोषणाई, सजावट आणि दांडीयाच्या तयारीवर चांगलेच पाणी फिरले. (Rain forecast for 3 days with thunder in Nashik district from today Navratri 2022 Nashik News)

मंडपात चिखल

सध्या सगळीकडे गरब्याचा उत्साह आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा गरबा-दांडिया खेळायला परवानगी दिल्याने आबालवृद्धांसह सारे मनमुराद आनंद लुटत आहेत. सगळीकडे नवरात्रौत्सवाचा उत्साह असताना गरब्यावर पावसाचं विरजण पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासून गरबा आणि दांडिया खेळाला उत्साह आला आहे. मात्र, आता पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने दांडिया रसिकांचा हिरमोड झाला. सायंकाळी दांडीया खेळण्याच्या मंडपात पाणी साचल्याने ठिकठिकाणी चिखल झाला. त्यामुळे मंडपात साचलेले पावसाचे पाणी काढून देण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत धावाधाव सुरू होती.

मेघगर्जनेसह मुसळधार

हवामान विभागाने पुढील तीन दिवस शहरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यात मेघगर्जनेसह परतीचा पाऊस बसणार आहे. त्यामुळे वादळ वारा आणि मेघगर्जनेसह कोसळलेल्या गरब्यावर पावसाचं संकट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT