raisins  esakal
नाशिक

बेदाणा दरात मोठी उसळी; गाठला पाच वर्षांतील उच्चांकी भाव

दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : द्राक्षाचे उपउत्पादन असलेल्या नाशिकच्या बेदाण्याचे प्रतिकिलो दर पाच वर्षांत शंभर ते सव्वाशे रुपयांच्या पुढे गेलेले नाहीत. यंदा मात्र दुबईसह परदेशातून मागणी वाढल्याने तसेच आवक घटल्याने बाजारभावाची ही पातळी ओलांडली गेली असून, प्रतिकिलो बेदाण्याचे दर सरासरी १५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. किलोमागे तब्बल २० ते २५रुपयांची उसळी पिंपळगाव बाजार समितीत नोंदविली गेली आहे.


नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांचे क्षेत्र दोन लाख एकर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. साहजिकच द्राक्षांचे उपउत्पादन असलेल्या पिवळा काजू अर्थात, बेदाण्याचे यंदा सोळा हजार टन उत्पादन झाले. दोन वर्षांपासून बेदाण्याचे दर शंभर रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर स्थिर आहेत. मात्र, यंदा दरवाढ होऊ लागली आहे. पिंपळगाव बाजार समितीत काही सौद्यांत दराचा आलेख वाढला आहे. गतआठवड्यात दोनशे टन बेदाण्याची आवक झाली. त्याला किमान शंभर रुपये, तर कमाल १६३ रुपये म्हणजेच सरासरी १५० रुपये दर मिळाला. गेल्या पाच वर्षांतील हा विक्रमी दर आहे.

दरम्यान, शीतगृहात अद्याप पाच हजार टन बेदाणा शिल्लक आहे. दरवाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी तो राखून ठेवला आहे. त्यामुळे आवकेत घट झाली आहे. शिवाय दुबई, मलेशिया, ओमान, सौदी अरेबिया येथून बेदाणा निर्यातदारांककडे मागणी नोंदविली गेली आहे. मागणी एवढा पुरवठा करण्यासाठी व्यापाऱ्यांची बेदाणा खरेदीत चढाओढ लागली आहे. त्यातूनही तेजी होत आहे.


कोरोनाकाळातही मोठी उलाढाल
कोरोनामुळे देशांतर्गत व परदेशांतील बाजारपेठामध्ये कुठे लॉकडाउन, तर काही ठिकाणी ग्राहकसंख्या रोडावली आहे. अशा प्रतिकूल स्थितीतही पिंपळगाव बाजार समितीत अकरा हजार टन बेदाण्याची खरेदी-विक्री झाली. हा बेदाणा देशांतर्गत, तसेच सातासमुद्रापार पोचला. रोख पेमेंट व जादा दरामुळे बेदाणा उत्पादक पिंपळगाव बाजार समितीत बेदाणा विक्रीला प्राधान्य देत आहेत.

आवक घटून परदेशातुन बंपर मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे नाशिकचा पिवळा बेदाणा भाव खात आहे. सांगलीच्या हिरव्या बेदाण्याला टक्कर देत आहे. नवा बेदाणा येण्यासाठी अजून चार महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे बेदाणा दरातील ही तेजी कायम राहील.
-चंद्रकांत राका, बेदाणा व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT