MNS  esakal
नाशिक

Raj Thackeray | मनसे महिला पदाधिकाऱ्यांना न्यायालयाकडून दिलासा

मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनसेच्या सात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शहरातून हद्दपार करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंधरा दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या मनसेच्या सात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्यायालयाने दिलासा देत त्यांच्या हद्दीपारीला २५ मेपर्यंत स्थगिती दिली आहे.

४ मेस पहाटेच्या सुमारास भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनसे महिला पदाधिकारी सुजाता डेरे, कामिनी दोंदे, अक्षरा घोडके, अरुणा पाटील, निर्मला पवार आणि स्वागता उपासनी यांना पोलिसांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजविण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणातून ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर या सर्वांना मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना १५ दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी केलेल्या कारवाईविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी (ता. ११) अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असता, त्यांनी हद्दपारीच्या आदेशाला २५ मेपर्यंत स्थगिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT