A rush of customers on a tempo that came for Rajasthan Futana sale at Dutt Mandir Chowk in Malegaon city esakal
नाशिक

Nashik News: राजस्थान फुटाणा ‘सौ का शेर’! मालेगाव शहरात स्वस्तातील फुटाणे खरेदीस गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात सध्या फुटाण्याची चव आबालवृद्धांसह सर्वांच्याच जिभेवर रेंगाळत आहे. राजस्थानहून बंजारा समाजबांधव शहर व परिसरात फुटाणे विक्रीसाठी आले आहेत.

राजस्थान फुटाणा ‘सौ का शेर’ असा स्पीकर लाऊन प्रमुख चौकाचौकात फुटाणे विक्री करत ही वाहने फिरत असल्याने फुटाणे खरेदीचा मोह अनेकांना आवरत नाही. यामुळे शहरात स्वस्त फुटाणे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. (Rajasthan Futana In Malegaon rush to buy cheap roasted chana Nashik News)

राजस्थानमधील चुरु, सुजवानगड, झुनझुनू, सिकर या शेखावटी परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात हरभरा डाळींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.

याच भागात हरभऱ्यावर प्रक्रिया करून फुटाणे तयार करणारे प्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणावर आहेत. येथून ठोक पद्धतीने तयार फुटाणे खरेदी करून हे टेम्पो शहरात दाखल झाले.

एरवी शहरात मालाच्या प्रतवारीनुसार ३० ते ४० रुपये पावशेर म्हणजेच १२० ते १६० रुपये शेर फुटाण्याचा दर आहे. राजस्थानचा फुटाणे शंभर रुपयास शेरभर मिळत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर त्याची खरेदी करत आहेत.

शहरातील पश्‍चिम भागातील मध्यवर्ती परिसरातील सर्व प्रमुख चौकात फुटाणे विक्री करणारे टेम्पो नजरेस पडत आहेत.

वेगवेगळ्या चौकात दिवसभर विक्री करुन सायंकाळी एखाद्या हॉटेलवर जेवण व तेथेच गाडीत किंवा हॉटेलच्या प्रांगणात आराम करून उदरनिर्वाह सुरु असल्याचे शेटाराम बंजारा या विक्रेत्याने सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आम्ही चौकात एका बाजूला रस्त्याच्या कडेला रहदारीला अडथळा होणार नाही अशी जागा पाहून ध्वनीक्षेपकाद्वारे विक्री करीत असल्याने चांगला प्रचार प्रसार होऊन जोरदार विक्री होत आहे.

यावर्षी प्रथमच आम्ही इकडे फुटाणे विक्रीसाठी आलो. एकूणच राजस्थानचा फुटाणे शहर व परिसराच्या पसंतीला उतरला आहे.

"आमच्याकडे पिवळा, काळा अशा दोन प्रकारचे फुटाणे विक्रीला आहेत. हा फुटाणे थेट फॅक्टरीतून येत असल्याने त्यावर चांगली प्रक्रिया झालेली आहे. मीठ व अन्य प्रक्रिया प्रमाणित करून होत असल्याने त्याची चवही एकसारखी आहे. यामुळे फुटाणे ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे. दिवसभरात ४० किलो फुटाण्याचा चार ते पाच गोणी विक्री होतात."

- भामराज बंजारा, फुटाणा विक्रेता, राजस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे ओपनर माघारी परतले! Shubman Gill ने पुन्हा मैदान गाजवले; गावस्कर, सोबर्स यांचा विक्रम मोडला

Latest Maharashtra News Updates : जळगावच्या पाचोर्‍यातील महसूल विभागामार्फत महसूल सप्ताहाचे आयोजन

'ठरलं तर मग' मालिकेसाठी आजीची गोंडस विनंती, व्हिडिओ पाहून जुई गडकरी म्हणाली... 'आजी, किती गोड...'

Canada Study Permit: कॅनडामध्ये स्टडी परमिटशिवाय शिक्षणाची परवानगी; कोण पात्र? काय आहेत नियम? वाचा, एका क्लिकवर

Yuzvendra Chahal: इंग्लंडच्या मैदानात चहलचा जलवा! ६ फलंदाजांना अडकवलं फिरकीच्या जाळ्यात; पाहा Video

SCROLL FOR NEXT