Actors performing scenes from Vrindavan drama in the finals of the State Drama Competition.
Actors performing scenes from Vrindavan drama in the finals of the State Drama Competition. esakal
नाशिक

Rajya Natya Spardha : विधवांच्या दुःखावर फुंकर घालणारे ‘वृंदावन’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधवा स्त्रियांना पुनर्विवाहाची परवानगी न दिल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम अत्यंत वेदनादायी पद्धतीने ‘वृंदावन’ नाटकात मांडले आहेत.

समाजमान्यता नसल्याने आश्रमातील महिलांच्या आयुष्याची होणारी परवड थांबवण्याचा प्रयत्न काही महिला करतात. मात्र, व्यवस्था नावाची समाजरचना त्यांना यातून बाहेर पडू देत नाही, हे समाजवास्तव या नाटकाने मांडली. (Rajya Natya Spardha final round Vrindavan blowing on suffering of widows nashik news)

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीची ‘वृंदावन' या नाटकाने सांगता झाली. सोमवारी (ता. २७) दुपारी बाराला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हे नाटक सादर झाले. पश्चिम बंगालमध्ये आजही विधवा पुनर्विवाहाला समाजमान्यता नाही.

विवाहास मान्यता नसली तरी त्यांना समाजात मानाचे स्थान तरी मिळावे, अशी माफक अपेक्षा आहे. मात्र, विधवांना त्यांच्या घरी ठेवले जात नाही. त्यांनी जावे तरी कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

त्यावर उपाय म्हणून वृंदावन आश्रमात या महिला राहतात. मंदिरांत भजन करून उदरनिर्वाह करतात. पण मिळणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी असल्याने गरजा भागवण्यासाठी प्रसंगी भीक मागावे लागते. या गरजांमधूनच काही अनैतिक प्रक्रिया बोकाळतात.

एका सर्वेक्षणानुसार वृंदावनमधील ३० टक्के महिला या लैंगिक शोषणाला बळी पडतात. यातील काही विधवा कालांतराने या मार्गाचा स्वतःहून अनिच्छेने स्वीकार करतात. यातून उद्भवणाऱ्या आजारांची त्यांना कल्पनाही नसते. ‘मंतो’ हे वयोवृद्ध व्यक्ती हा आश्रम चालवतो.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

'जानकी मॉं' ही या विधवांची व्यवस्था बघणारी वयोवृद्ध स्त्री. बाला या पेशाने दलाल असणारा पुरुष. तो या विधवांना मंदिरातल्या भजनाचे कामे मिळवून देत असतो. त्याच्या बदल्यात त्यांना पैसे आणि जेवणाची टोकण पुरवत असतो.

या कामाबरोबरच आश्रमातल्या विधवांना फसवून गोड बोलून आणि प्रसंगी बळजबरीने शरीरविक्रय करायला भाग पाडत असतो. यया वातावरणात आरीश नावाची विधवा आश्रमात प्रवेश करते.

आश्रमातल्या घटना तिला काही दिवसातच कळतात. मुळची कलाकार मनाची आणि बंडखोर स्वभावाची असल्याने आरीश आश्रमातल्या वाईट गोष्टींना विरोध करते. यासाठी आश्रमातल्या विधवांमध्ये संघटन करते. प्रसंगी सगळ्यांचा विरोध पत्करते. पण या व्यवस्थेमध्ये तिचा विरोध फार काळ टिकत नाही. शेवटी ती पण इथल्या व्यवस्थेचा बळी ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT