Actors performing scenes from the play 'Chorila Gela' in the state drama competition. esakal
नाशिक

Rajya Natya Spardha 2023: हरवत चालेल्या गोष्टीचा शोध घेणारे ‘चोरीला गेलाय’

प्रतीक जोशी

Rajya Natya Spardha 2023: हरवलेल्या नाही तर हरवत चालेल्या गोष्टींच्या शोधाशोधीचा खेळ दाखविणारी नाट्यकृती म्हणजे ‘चोरीला गेलाय’. ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मंगळवारी (ता. २८) महात्मा गांधी विद्यामंदिर, पंचवटी या संस्थेतर्फे हे नाटक सादर करण्यात आले. कृष्णा वाळके लिखित या नाटकाचे प्रवीण जाधव यांनी दिग्दर्शन केले.

नवसाला पावणाऱ्या गावातील मारुतीची चोरी होते अन् येथूनच नाटकाच्या कथानकाला सुरवात होते. (Rajya Natya Spardha search for lost object marathi drama chorila gela nashik news)

या गावात आधीच मुरलेले राजकारण असते. त्यात मारुतीची चोरी झाल्याने त्याला अजूनच खतपाणी मिळायला लागते. आजी- माजी सरपंच आमनेसामने येतात. गावात अंधश्रद्धा बळावते अन् गावातील परिटाच्या अंगात मारुती येतो.

गावकऱ्यांना सांगतो, जोपर्यंत गावचा विकास होणार नाही तोपर्यंत देव गावात पुन्हा येणार नाही. मग काय, आजी- माजी सरपंच सरसावतात अन् गावाच्या विकासाचे काम हाती घेतात. या सर्वांत मारुती असे सापडतात जसे की कुठे गेलेचे नव्हते. समाजात जागृती आणणाऱ्या या नाटकाच्या कथानकातून विनोदी प्रसंगांची मांडणी केल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

जयराम कुंडारिया, स्वप्नील गायकवाड, साक्षी बनकर, कृत्तिका कागलकर, आर्यन जाधव, समाधान मुर्तडक, आनंद गांगुर्डे, प्रवीण जाधव, काजल खैरनार, शिवानी कौशल, प्रथमेश पाटील, प्रतीक बर्वे, संकेत पगारे, योगेश साळवे, दीपाक्षी नागपुरे, दुर्गेश गायकर, सतीश घुगे, विकास जाधव, अशोक चांदोडे, योगेश राठोड, प्रकाश गोसावी, ओम पऱ्हे, चंदना चादोडे, गुलाल गुप्ता, कृष्णा शिरसाठ या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या. विनोद राठोड यांनी प्रकाशयोजना, तर रोहित सरोदे यांनी संगीत केले. नेपथ्य समाधान मुर्तडक व आनंद गांगुर्डे यांनी साकारले. साक्षी बनकर, प्रतिमा राठोड यांनी रंगभूषा, तर प्रथमेश पाटील, दुर्गेश गायकर यांनी वेशभूषा साकारल्या.

ही स्पर्धा आहे...

नाट्य स्पर्धेत परीक्षक महत्त्वाचे असतात. त्यांचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे त्यांना नाटक पाहताना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून नाट्यगृहात पुढील काही रांगांवर प्रेक्षकांना बसू दिले जात नाही. मात्र काही अतिउत्साही असे असतात जे परीक्षकांपुढे जाऊन बसतात, काही उभे ठाकतात. त्यामुळे परीक्षकांना नाटक पाहण्यास अडचण होते आणि याचा थेट फटका नाटक सादर करणाऱ्या संघालादेखील बसू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांनी स्पर्धेत शिस्त पाळलीच पाहिजे.

आजचे नाटक - अभी तो मैं जवान हूँ

लेखक व दिग्दर्शक - हेमंत गवळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

INDW vs PAKW: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतरही हरमनप्रीत कौर नाराज! म्हणाली, आता मायदेशात गेल्यानंतर...

RSS History: अभ्यासक्रमात आता 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास'; 'या' विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Natural Collagen Boosters: सप्लीमेंट्स विसरा! 'या' 5 नैसर्गिक पदार्थांनी वाढवा कोलेजन, त्वचारोगतज्ज्ञांनी शेअर केला खास Video

SCROLL FOR NEXT