Ranwad Sugar Factory esakal
नाशिक

Nashik News | रासाका ऊस उत्पादकांना देणार एकरक्कमी रक्कम : रामभाऊ माळोदे

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवत (जि. नाशिक) : नफा मिळविण्यासाठी नव्हे तर ऊस उत्पादकांच्या भावना, दु:ख जाणून घेऊन बंद असलेल्या चुली पुन्हा पेटव्या या उद्देशाने आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली (स्व) अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंतने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतली आहे.

ऊस उत्पादक, कामगार वर्ग, ऊसतोडणी कामगार व रासाका कार्यक्षेत्रावरील छोटे- मोठे व्यवसायधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे यांनी दिली. (Rambhau Malode statement Lump sum amount to be given to sugarcane growers by ranwad sugar factory Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

रामभाऊ माळोदे म्हणाले, यंदा कारखान्याचा ४० वा गळीत हंगामाचा प्रारंभ होऊन काही दिवसच झाले असताना देखील कारखाना प्रशासनातर्फे यंदाच्या २०२२-२३ या वर्षासाठी शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात एकरक्कमी जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.

कारखान्यातर्फे नव्याने उभारण्यात आलेला डिस्टलरी प्लँट सुरु होणार असल्याचे उपाध्यक्ष अरविंद जाधव यांनी सांगितले. परिसरातील तसेच, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रानवड साखर कारखान्यास ऊस पुरवावा असे आवाहन आमदार दिलीपराव बनकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT