Rubble on the road leading to the fort. esakal
नाशिक

Nashik News : मुल्हेर किल्ला रस्त्याला भगदाड; पर्यटकांचा जीवघेणा प्रवास!

सकाळ वृत्तसेवा

अंतापूर (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील मुल्हेर किल्ल्याकडे जाणाऱ्या नाल्यावरील फरशी रस्ता वाहून गेल्याने किल्ल्यावर जाण्यास मोठी गैरसोय होत असून, संबंधित विभागाने तातडीने फरशीपुलाचे काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Rampage on Mulher Fort Road Dangerous journey of tourists Nashik News)

बागलाण तालुक्यातील मुल्हेर ऐतिहासिक किल्ला महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील किल्ल्यावर भगवान सोमेश्‍वर महाराज, गणपती मंदिरासह हनुमान, दुर्गामाता मूर्ती, सपाटीवर भडंगनाथ महाराज यांची समाधी, वेगवेगळ्या रंगाच्या नऊ पाण्याच्या टाक्या, स्वराज्यरक्षक शिवप्रसाद व रामप्रसाद, हजार बांगडी तोफा, पाण्याच्या टाक्या, विहिरी आदी ऐतिहासिक ठेवा, निसर्गसौंदर्य, वन्य प्राणी- पक्षी असल्याने दैनंदिन मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक येथे व शेजारील हरगड किल्ल्यावर येतात.

किल्ल्यावरून येणाऱ्या नाल्यावर मागीलवर्षी कच्च्या स्वरूपात पाईप टाकून त्यावर भराव टाकण्यात आला होता. परंतु, पहिल्याच पावसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यावरील पाईप, भराव वाहून गेल्याने रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे किल्ल्यावर जाण्यास गैरसोय होत आहे. तसेच, अठरा वर्षापासून किल्ल्यावर वास्तव्यास असलेले महंत १०८ सुदामादास महाराज उपस्थित असल्याने भाविकांची गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर येत्या २५ व २६ डिसेंबर रोजी सुदामादास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विश्‍वशांतीयज्ञ होणार असून, देशातील त्यागी साधू महंत या ठिकाणी येणार आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन रस्त्याचे काम तातडीने करावे, सोमेश्‍वर मंदिरापर्यंत राहिलेला रस्ताही पूर्ण करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता तिवारी, अशोक येवला, सोमनाथ बागूल, ग्रामपंचायत सदस्य योगेश सोनवणे, जितेंद्र सोनवणे, श्याम शहा, संदीप जगताप, सुनील चव्हाण, पवन तिवारी, उत्तम पवार, आनंदा पवार, छोटू पवार, बंडू नाईक यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

"किल्ल्याकडे जाणारा रस्ता चार महिन्यांपासून तुटला असून, मुंगसे रस्त्यावरील किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अनेक वाहनधारकांचा अपघात झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून दुरुस्ती करावी व दिशादर्शक फलक लावावेत."- शिवाजी जाधव, ग्रामस्थ, मुल्हेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनच्या पुन्हा कुरापती, 'मॅकमोहन लाइन'च्या ४० किमीवर एअरबेस; अरुणाचलपासून १०० किमीवर विमानांसाठी ३६ हँगर

Shreyas Iyer: आता तर त्याला सोबतच घरी घेऊन जाऊ! सूर्यकुमार यादवने दिले श्रेयसच्या प्रकृतीचे अपडेट्स, मित्राची अवस्था पाहून...

Organic Banana Success : सोनईची केळी 'दुबई'च्या बाजारपेठेत; भुसारी परिवाराचे कौतुक; सेंद्रिय शेतीने अधिक उत्पन्नाची गोडी

Latest Marathi News Live Update : एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी

Solapur Accident:'टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अपघातात २ मजुरांचा मृत्यू'; अज्ञात वाहनाची धडक, हातावर पोट अन्..

SCROLL FOR NEXT