Muslim brothers breaking fast at NCP party office esakal
नाशिक

Ramzan Festival : दानशूरांची गरिबांना मदत; इफ्तार पार्टींमध्ये मोठ्या प्रमाणात मालेगावरांची हजेरी

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : रमजान पर्वाला सुरवात होताच गरिबांच्या मदतीसाठी दानशूर सरसावले आहेत. रमजान पर्वात दानशूरांकडून गरिबांना खजूर, पाव (नान), केळी, फळे वाटप केली जातात.

अनेक दानशूर तसेच विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यास सुरवात झाली आहे. या पार्टीमध्ये गरीब नागरिकांचा राबता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. (Ramzan Festival Donors help poor large number of Malegaon people attend Iftar parties nashik news)

रमजान पर्वात येथील बहुसंख्य मुस्लीम बांधव उपवास (रोजे) करीत असतात. रमजान पर्वात अनेक कुटुंबीय प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या गरिबांना मदत करतात. सायंकाळी उपवास सोडण्याच्या वेळेस अन्नदान म्हणून विविध पदार्थांचे वाटप केले जाते. खजूर व फळे प्राधान्यक्रमाने वाटप करतात.

शहरात यंत्रमाग प्रमुख व्यवसाय आहे. यंत्रमागावर काम करणाऱ्या मजुरांसाठी अनेक मालक उपवास सोडतेवेळी फळे व इतर वस्तू त्यांना पुरवितात. काही दानशूर व्यक्ती गरजूंना मदत करीत आहेत. स्वयंसेवी संस्थांतर्फे सामुहिक रोजा सोडण्याचा कार्यक्रम घेतला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मालेगाव शहर जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी पहिल्या रोजापासून सामुहिक रोजा सोडण्याचा उपक्रम सुरु केला आहे. रोज सायंकाळी श्री. शेख यांच्या जुना आग्रा रस्त्याजवळील कार्यालयात हा उपक्रम राबविला जातो.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असतो. पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच गरीब नागरिक येथे येतात. श्री. शेख सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवीत आहेत. संपूर्ण रमजान पर्वात सामुहिक रोजा सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

अशाच स्वरूपाचे कार्यक्रम अनेक यंत्रमाग कारखान्यांमध्ये रोज होत आहेत. याशिवाय दानशुरांकडून ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. रमजान पर्वाच्या अखेरच्या टप्प्यात ईदसाठी दानशूरांकडून गरिबांना कपडे, अन्नधान्य देखील वाटप केले जाते.

इफ्तार पार्टींची रेलचेल

रमजान पर्वात इफ्तार पार्टीचे शहरात मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. यात राजकीय नेते आघाडीवर असतात. आगामी काळात येथील महापालिका निवडणूक होणार आहे. या पाश्‍र्वभूमीवर यावर्षी इफ्तार पार्टींची रेलचेल दिसून येणार आहे.

रमजानचे सात रोजे पूर्ण झाले आहेत. रमजान पर्वाच्या अखेरच्या टप्प्यात इफ्तार पार्टींच्या संख्येत वाढ होणार आहे. काही सामाजिक संस्थांकडून हिंदू- मुस्लीम बांधवांना एकत्र आणत इफ्तार पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता वाढीचे प्रयत्न केले जातात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT