ranji cricketer shekhar gawli fell into a 250 foot ravine nashik marathi news 
नाशिक

ब्रेकिंग : मोबाईलवरून सेल्फी घेताना नाशिकचे रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा मृत्यू

विक्रांत मते

नाशिक : इगतपुरी तालुक्यात आज मंगळवारी (ता. 1) संध्याकाळच्या सुमारास पर्यटनाकरीता आलेले नाशिकचे रणजी क्रिकेटपटु शेखर गवळी हे मोबाइलद्वारे सेल्फी घेत असताना अचानकपणे पाय घसरून 250 फुट खोल दरीत पडले असून शोध कार्य सुरू आहे. अंधारामुळे मोहीम थांबवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी ते सेल्फी घेत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट २५० फूट दरीत कोसळले. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. तसेच इतर स्थानिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्यांचा काहीही शोध लागू शकला नाही.

उद्या घेतला जाणार शोध

दरम्यान त्यांचा शोध घेण्यासाठी नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी उद्या (2 सप्टेंबर) रवाना होणार आहे. त्यावेळी पुन्हा त्यांचा शोध घेतला जाईल.  शेखर गवळी हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहे. त्यामुळे या दुर्घटनेने क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना धक्का बसला आहे.

राज्यात विसर्जनादरम्यान १० जणांचा बुडून मृत्यू

राज्यात गणेश विसर्जनादरम्यान आतापर्यंत १० जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात नाशिकमध्ये सहा जणांना, जळगावात तिघांना तर पुण्यात एकाला विसर्जनावेळी आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक तालुक्यात चौघांचा तर देवळा आणि निफाड तालुक्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समजते.

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT