rape case esakal
नाशिक

Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या पतीपासून फारकत घेण्यास भाग पाडून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित प्रकाश पवार (३४, रा. यशोदा नगर, कॉलेज रोड, नाशिक), असे संशयिताचे नाव आहे. (Raped married woman by luring her for marriage Nashik Crime News)

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

विवाहितेच्या फिर्यादीनुसार, संशयित पवार याने विवाहितेशी ओळख करून तिचा विश्वास संपादन केला. तसेच, प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे खोटे आमिषही दाखविले. यातूनच संशयिताने विवाहितेला तिच्या पतीपासून फारकत घेण्यास भाग पाडले.

त्यानंतर त्याने पीडितेवर तिच्या इच्छेविरोधात वारंवार बळजबरीने बलात्कार करीत तिचे शारीरिक व मानसिक शोषण केले. तसेच, पीडितेला शिवीगाळ करून मारहाणही केली. सदर प्रकार १४ फेब्रुवारी २०२० ते १३ एप्रिल २०२१ या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी पीडितेने गंगापूर पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोघेही उच्चशिक्षित असून, संशयित पवार याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक महेश येसेकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार हार्दिक पांड्या; ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय अ संघ जाहीर

DK Shivakumar: मंत्र्यावर EDची रेड पडताच मुख्यमंत्री डीके शिवकुमार संतापले; म्हणाले, आता आम्ही घाबरणार नाही...

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

SCROLL FOR NEXT