rasaka 
नाशिक

रासाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा; कायद्यात बदल केल्याने निविदाप्रक्रियेला सुरवात

दीरक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेला रासाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली आहे. सक्षम सहकारी संस्थांना भाडेतत्त्वावर साखर कारखाने घेता येतील, असा बदल राज्य शासनाने कायद्यात केल्याने आमदार दिलीप बनकर यांची एकहाती सत्ता असलेल्या पिंपळगाव बाजार समिती, स्वर्गीय अशोक बनकर पतससंस्था, भीमाशंकर ॲग्रो प्रॉडक्स या संस्था निविदा भरण्याची शक्यता आहे. 

गेल्या आठ वर्षांपासून निफाड साखर कारखाना स्वाहाकारामुळे ३५० कोटी रुपयांच्या कर्जात बुडाला. तर रानवड कारखान्याची अग्निप्रदीपन वर्षापासून होऊ शकले नाही. निसाकानंतर ऊस उत्पादकांचा आधारवड ठरलेला रानवड मुंडे यांच्या वैद्यानाथ, बागडे यांच्या छत्रपती संभाजी आदी संस्थांनी चालविण्याचा प्रयत्न केला. पण करार अर्ध्यावर सोडून व शेतकऱ्यांची एकूण २४ कोटी रुपयांची देणी थकवत त्यांनी धूम ठोकली. रानवड भाडेतत्त्वावर सुरू करता येणे शक्य असूनही शासनाकडून दिरंगाई होत असल्याने निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट होती. 

...तर आश्‍चर्य वाटायला नको 
आमदार बनकर यांनी सहकारमंत्र्यांशी बैठका घेऊन व सहकारी संस्थांना साखर कारखाने भाडेतत्त्वावर घेता येण्याचे कायद्यात रुपांतर करून घेतले. टीकेला उत्तर न देता दोन महिने उशिरा का होईना निविदाप्रक्रिया राबवत आश्‍वासन पूर्तीकडे पाऊल टाकले. ११ जानेवारी २०२० ला निविदा उघडून रासाका कोणत्या संस्थेला द्यायचा, याबाबत निर्णय होईल. आमदार बनकर यांच्या ताब्यातील तिन्ही संस्था निविदा भरणार, यात शंका नाही. ते स्वत: सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने रासाकाची सूत्रे पुढील पंधरा वर्षांसाठी बनकर यांच्या ताब्यात आली तर आश्‍चर्य वाटायला नको. 


रासाका म्हणजे विषाची परीक्षा 
प्रतिदिन अवघी एक हजार २५० टन ऊस गाळपाची क्षमता असलेल्या रासाका चालविण्यास घेणे म्हणजे विषाची परीक्षा आहे. वैद्यनाथ व छत्रपती संभाजी राजे या दोन बड्या साखर कारखान्यांनी रासाका चालविताना गुडघे टेकले. त्यातच यंदा हंगामाच्या शेवटी रासाका सुरू होण्याची चिन्ह असल्याने उसाचे क्षेत्र मिळण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. ऊस तोडणीचा हंगाम निम्म्याच्या पुढे सरकला आहे. दोन हजार एकरांवर सध्या ऊस शिल्लक आहे. ऊसतोड कामगार, वाहतूक, यंत्रसामग्रीची दुरुस्ती अशी आव्हाने आहेत. 


कोरोनाचे संकट ओढावल्याने निविदाप्रक्रियेला सहा महिने दिरंगाई झाल्याची खंत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून रासाका लवकच सुरू होईल. रासाका सुरू झाल्यानंतर निसाका सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. टीकेला उत्तर न देता किंवा श्रेयवादात न अडकता शब्दपूर्तीला प्राधान्य देणार आहे. 
-दिलीप बनकर, आमदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT