Stray dogs standing on the road in rocky areas. esakal
नाशिक

जुने नाशिक परिसरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : मोकाट कुत्र्यांचा जुने नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. वाहनचालकांच्या अंगावर धावून जाणे, लहान मुलांना इजा पोचवणे असे प्रकार वारंवार घडत आहे. तक्रार करूनही महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (rash of stray dogs in old Nashik area Nashik Latest Marathi News)

जुने नाशिक परिसरात विशेषतः रात्री प्रवास करणारे वाहनचालक, नागरिकांना अधिक त्रास जाणवत आहे. ठिकठिकाणी घोळके करून कुत्रे उभे राहत असतात. अशा वेळेस तिथून जाणाऱ्या नागरिकांवर आणि वाहनचालकांवर ते धावून जातात. परिसरात खेळणाऱ्या चिमुकल्यांवरदेखील धावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

फुले मार्केट, कठडा, नानावली, शिवाजी चौक, अमरधाम परिसर या भागात मोकाट कुत्र्यांचा अधिक वावर आहे. फुले मार्केट तर त्यांचे आश्रयस्थान बनले आहे. अनेक वेळा दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर कुत्रे धावून जात असल्याने अपघात घडले आहे. काही भागात त्यांच्याकडून लहान मुलांना लक्ष्य करत जखमी करण्यात आले आहे.

परिसरातील नागरिकांकडून याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि महापालिकेस तक्रार करण्यात आली आहे. अद्याप त्यावर कारवाई झाली नसल्याने दिवसेंदिवस त्यांचा उच्छाद वाढतच आहे. महापालिकेकडून वेळीच कारवाई केली नाही, तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आल्या आहे. शिवाय मोकाट कुत्र्यांचा महापालिकेकडून बंदोबस्त करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली.

"मोकाट कुत्र्यांमुळे भीतीच्या सावटात आहे. आतापर्यंत बऱ्याच वेळा तक्रार करण्यात आली आहे. परंतु महापालिकेकडून अद्याप कुठली कारवाई करण्यात आलेली नाही. दुर्घटना घडल्यास महापालिकेस जाग येईल का?" - नासिर पठाण, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Latest Marathi News Updates : निवडणूक आयोगात भाजप कार्यकर्ते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

SCROLL FOR NEXT