ration card.jpg 
नाशिक

डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले! वयाच्या चाळिशीत मिळाला रेशनकार्ड अन् जातीचा दाखला; काय घडले?

संतोष विंचू

नाशिक / येवला : रेशनकार्ड, जातीचा दाखला काढायचा कसा हेच माहीत नाही, तेव्हा मिळणार कसा? म्हणून नादच सोडून दिलेल्या पुरणगाव येथील आदिवासी बांधवाला वयाच्या चाळिसाव्या वर्षी रेशनकार्ड व जातीचा दाखला मिळाला. आणि गरजूच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. वाचा काय घडले?

रेशनकार्ड अन् जातीचा दाखला चाळिशीत हाती 
पुरणगाव येथील ज्ञानेश्वर वाघ यांना रेशनकार्ड व दाखल्याची गरज असताना कागदपत्रे पूर्तता करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे कार्यालयात चकरा मारूनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे सभापती गायकवाड यांनी स्वतः सर्व कागदपत्रे करून पाठपुरावा करून त्यांना जातीचा दाखला व त्यांच्या मुलांचे जातीचे दाखले, रेशनकार्ड स्वतः काढून दिले. आता त्या कुटुंबाला शबरी घरकुलाचाही लाभ देणार आहेत. सभापती कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी व त्याचे काम पूर्ण होण्यासाठी सभापतींकडून पाठपुरावा केला जातो. पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी पुढाकार घेऊन अडचणी दूर करत दाखला अन् रेशनकार्ड मिळवून दिला. 

आदिवासी समाजबांधव आजही आले आहेत. त्यामुळे शासकीय कागदपत्रांची पूर्तता करताना त्यांची अडचण होते. म्हणूनच अशा गरजूंना रेशनकार्ड व दाखले मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतला असून, अशा गरजूंनी अडचण होत असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. -प्रवीण गायकवाड, सभापती 

पुरणगावातील आदिवासी बांधवाला सभापती प्रवीण गायकवाड यांचा आधार 

आमच्यासाठी गायकवाड यांचे काम देवदूतासारखे असल्याची भावना या वेळी वाघ व सहकाऱ्यांनी व्यक्त केली. दाखला, रेशनकार्ड देताना ज्ञानेश्वर वाघ, बाळू पवार, सचिन कुराडे, महेश उगावकर, खंडू बहिरम, साईनाथ गाडे, रमेश शेळके, दत्तू शेळके, श्रावण काळे, सुरेश शिंदे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT