adivasi-gaurav-din-nashik-4.jpeg 
नाशिक

भूमिहीन आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका द्याव्यात - ॲड. के. सी. पाडवी

विनोद बेदरकर

नाशिक : आदिवासी समाजातील भूमिहीन कुटुंबांना शिधापत्रिका वितरित कराव्यात, कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी स्थानिक पीक नागली व भगरीवर प्रक्रिया करून बालकांच्या आहारात त्याचा समावेश करावा, असे निर्देश आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिले.

आदिवासी विकास आढावा बैठक 
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी वर्षा मिणा, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर आदी उपस्थित होते. ॲड. पाडवी म्हणाले, की कोरोनामुळे कातकरी, भिल्ल समाजातील गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी खावटी योजनेतून अन्नधान्य उपलब्ध करून दिले जावे. जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. शिधापत्रिकेपासून जे वंचित कुंटुब आहेत त्यांचे विभक्तीकरण करून त्यांनाही शिधापत्रिका देण्याच्या सूचना दिल्या. 

शासनस्तरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन

आदिवासी बालकांच्या कुपोषणाची समस्या पूर्णपणे सोडविण्यासाठी धोरणात्मक बदल करावा. स्थानिक पीक नागली व भगरीवर प्रक्रिया करून बालकांच्या आहारात त्याचा समावेश करावा. त्यासाठी सुरुवातीला काही बालकांना आहार देऊन त्यांच्यातील बदलांचे निरीक्षण करून तसा अहवाल आदिवासी विभागाला देण्याचे निर्देश दिले. तसेच या वेळी वनहक्काच्या जमिनींचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती नेमून शासनस्तरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. तत्पूर्वी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी कोरोनाच्या काळात एक हजार ८३१ कुटुंबांना ज्यामध्ये शिधापत्रिका नसलेले अनुसूचित जमातीचे कुटुंब, कातकरी विधवा महिला, अपंग लाभार्थी यांना दोन हजार ४२४ क्विंटल धान्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती दिली.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT