rupesh patil.jpg 
नाशिक

लॉकडाऊनमुळे युवकाचे नैराश्य इतके वाढले की त्याने घेतला धक्कादायक निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला रावेर येथील रुपेश हा भावासोबत नाशिकमध्येच अडकला. लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल होऊ लागले. अन् खोलीतच बंद असल्याने नैराश्य अन् ताणतणाव वाढला..मग त्याने घेतला असा निर्णय की सगळ्यांनाच धक्का बसला.
 

असा घडला प्रकार

रुपेश भरत पाटील (वय २२) असे या मुलाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, रावेर येथील पाल रोडवर श्रीराम पाटील यांच्या फॅक्ट्रीमध्ये वास्तव्यास असलेल्या भरत पाटील यांची दोन्ही उच्च शिक्षणासाठी नाशिक येथे राहतात. दोघाही मुलांची नावे मयूर व रुपेश पाटील असे असून ते शहरातीलच एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. कोरोना व्हायरसच्या शिरकावानंतर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी जिल्हाबंदी केल्यामुळे शहरात अडकून पडले आहेत. यातीलच रुपेश एक होता. त्याचे जेवणाचे हाल होत असल्याचे त्याच्या नातेवाईकांना समजले. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांची परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा विद्यार्थी तणावात होता.

तर रुपेशने असे पाऊल उचलले नसते...

अखेर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या मुलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्या मूळगावी आणला. रुपेशच्या वडिलांनी त्याला घरी आणण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र त्यांनी परवानगी नाकारल्यामुळे रुपेशला नाशिकलाच थांबावे लागले. जर ती परवानगी मिळाली असती तर रुपेश वाचला असता असं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar look ajit pawar : पार्थ पवारांनी खासदारकीची शपथ घेतली पण, त्यांचा लूक पाहिला का? अजित दादांची येईल आठवण

Baramati News: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे का घेतला? हर्षवर्धन सपकाळांनी खरं कारण सांगितलं; आतली बातमी आली समोर

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

SCROLL FOR NEXT