erandgaon.jpg 
नाशिक

एरंडगावचे होतकरू रवींद्र साताळकर ठरले शेतकऱ्यांसाठी आधारवड...एकदा वाचाच 

विजय पेंढारे :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (एरंडगाव) येथील मुख्य व्यवसाय शेती असल्याने सर्वसामान्य लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य स्रोत म्हणून शेतीकडे पाहिले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला अन्‌ सर्वच व्यवसाय ठप्प झाले. त्याचा शेती व्यवसायासही फटका बसला. या कठीण काळात शेतकरीवर्गास येथील श्री साई दूध संकलन केंद्राचा एकमेव आधार मिळाला...वाचा सविस्तर 

कुशल मार्गदर्शनाने यशस्वी दुग्धोत्पादक

दूध उत्पादकांची आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळणाऱ्या या केंद्राची सुरवात येथील होतकरू रवींद्र साताळकर यांनी दहा वर्षांपूर्वी केली. साताळकर यांनी बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण करून 22 वर्ष नाशिक जिल्हा दूध संघात नोकरी केली. असमाधानकारक पगारामुळे नोकरी सोडली व स्वतःचा व्यवसाय सुरू केला. येथील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रेरित केले. आपल्या कुशल मार्गदर्शनाने त्यांना यशस्वी दुग्धोत्पादक बनविले. आज साताळकर यांचा दूध संकलनाचा व्यवसाय खऱ्या अर्थाने दूध उत्पादकांचा आधारवड ठरला आहे. 

गोदावरी दूध संघास जाणारे तालुक्‍यातील गावनिहाय दूध संकलन लिटरमध्ये 

देवठाण - 15 हजार, निमगाव - तीन हजार 

पाटोदा - दहा हजार, एरंडगाव - दोन हजार 

पिंपळगाव ज. - एक हजार, अंदरसूल - एक हजार 

नगरसूल - एक हजार, भारम - एक हजार 

सायगाव - दोन हजार, धुळगाव - एक हजार 

दुग्ध व्यवसायावर येथील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. कठीण काळात दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून दूध उत्पादकांना मदत करू शकलो, याचा मनापासून आनंद वाटतो. - रवींद्र साताळकर, संचालक- श्री साई दूध संकलन केंद्र  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT