deepak-pandey.jpg 
नाशिक

VIDEO : पोलिस स्टेशन बघून संतापले CP दीपक पांडे; पोलिस निरीक्षकांची केली कान उघडणी

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिकरोड : नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिकरोड येथील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उपनगर व नाशिकरोड पोलीस स्टेशनची पाहणी केली. यावेळी त्यांनी नाशिक रोड पोलीस निरीक्षकांसह अधिकाऱ्यांची कानउघडणी करत 'बिजली तुमचे एक नंबर वरून लास्ट नंबर वर आले आहे' अशा शब्दांमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस निरीक्षक बिजली यांना खडे बोल सुनावले.

नाशिक रोड पोलिस निरीक्षकांची कान उघडणी

गेल्या दोन महिन्यांपासून गावठी कट्टे, कोयते, तलवारी मोठ्या प्रमाणावर सापडत आहे. चोऱ्या-माऱ्या, दरोडे, खुनाच्या घटना ही मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक रोड, उपनगर पोलीस स्टेशनला भेट देत गुन्हेगारीचा आढावा घेतला. यामध्ये पांडे यांनी नाशिक रोड पोलिस स्टेशन येथील जुन्या इमारतीची पाहणी केली. या पाहण्यात त्यांनी 'बिजली तुमचे एक नंबरवरून लास्ट नंबरवर आले आहे'. अशा शब्दात अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात नाशिक रोड कारागृहाचे पोलीस अधीक्षक प्रमोद वाघ, अशोक कारकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गुन्हेगारीत वाढ 

नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. संघटित गुन्हेगारीने नाशिक रोडचे सामाजिक वातावरण खराब होत चालले असतांनाच पोलीस आयुक्त यांनी नाशिकरोड येथील गुन्हेगारीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना खडे शब्दात खडेबोल सुनावले. येणाऱ्या दिवाळीच्या धामधुमीत गुन्हेगारी भडकायला नको. यासाठी योग्य ते उपाय योजना करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले. नाशिक रोड पोलीस स्टेशनची वाटचाल पूर्वी पोलीस दलात पहिल्या रँकमध्ये होती. आता ती शेवटच्या रेंकमध्ये येत असल्याची बाब पोलीस निरीक्षकांनी अधिकाऱ्यांना बोलून दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT