zp nashik esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्ह्यातील शाळांमध्ये मुख्यमंत्र्यांचे पत्राचे वाचन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी पत्र लिहिले

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी पत्र लिहिले आहे. सदर पत्र जिल्ह्यातील शाळांमध्ये पोचले असून, या पत्राचे विद्यार्थी, पालक, गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांनी वाचन करावे. (Reading of Chief Minister's letter in schools of district nashik zp news)

सदर वाचन करताना सेल्फी, दोन -तीन वाक्य असलेले घोषवाक्य, १० ओळीचा अभिप्राय यासह शाळेने अपलोड करावयाचा असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली.

गंगापूर रोडवरील मविप्र संस्थेच्या सीएमसीएस महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतीच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याबाबत गटातील गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व मुख्याध्यापक खासगी शाळा.

विषयतज्ज्ञ्, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेस नाशिक उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक संचालक एल.डी. सोनवणे, डाएट (नाशिक)अधिव्याख्याता औटी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राथमिक उपशिक्षणधिकारी भास्कर कनोज, धनंजय कोळी, विस्तार अधिकारी नीलेश पाटोळे.

संतोष झोले, समग्र शिक्षाचे सुनील दराडे, अनिता देशमुख, जयवंत शिंदे हे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनेच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी या कार्यक्रमात शाळा नोंदणीकरून स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे.

१ फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळांनी सरल पोर्टलवरील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टॅबवर नोंदणी करावयाची आहे. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान केंद्रस्तर मूल्यांकन, ३ ते ५ फेब्रुवारीला तालुकास्तर मूल्यांकन व ५ ते ८ फेब्रुवारीला जिल्हास्तर मूल्यांकन होणार आहे.

यात शाळांना पारितोषिके देण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळांनी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर येण्यासाठी शाळांनी तयारी करावी, अशा सूचना यावेळी शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी दिल्या. मुख्यमंत्री यांचे संदेश पत्र शाळांना देण्यात आले आहे.

हे पत्र विद्यार्थी, पालक, गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांनी वाचन करावे. राज्यातील सर्वात छान राज्यस्तर सेल्फी मधील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत स्नेहभोजनचे आमंत्रण मिळणार आहे. याकरिता सर्व शाळांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन बच्छाव यांनी कार्यशाळेत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT