Fine collection reference image  esakal
नाशिक

Nashik : बेशिस्त वाहनचालकांना हिसका; 10 लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण वाहतूक पोलिसांकडून बेशिस्तांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. नवनियुक्त पोलिस अधीक्षकांनीही जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजनांसह बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिल्याने गेल्या चार दिवसांत ग्रामीण वाहतूक शाखेने दहा लाखांचा दंड वसूल केला आहे. (reckless driver 10 lakh fine collected by rural police nashik Latest Marathi News)

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील विविध भागांचा तपशीलवार आढावा घेत आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील वाढत्या अपघाती घटनांची माहिती घेतल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश ग्रामीण वाहतूक शाखेला दिले आहेत. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्तांविरोधात थेट दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश बजावले होते.

त्यानुसार नाशिक ग्रामीण वाहतूक पोलिस शाखेचे पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेने जिल्हाभर बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. गेल्या चार दिवसांत जिल्हाभरात ग्रामीण वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन हजार २२३ बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडाची कारवाई करीत दहा लाख ९६ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये प्रवाशांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ५६ वाहनांचाही समावेश आहे.

जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी

वर्ष प्राणांकित अपघात अपघातातील मृत्यू

२०२१ ७८८ ८६२

२०२२ (ऑक्टोबरपर्यंत) ६९४ ७५२

"रस्त्यावरील प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी अपघातांना आळा घालण्यासाठी बेशिस्त, बेजबाबदार व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत." - शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time table बघा अन् लागा तयारीला...

Pune Bajirao Road Murder: पुण्यात कायद्याचा धाकच संपला? बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने खून, रस्त्यावर रक्तपात

Latest Marathi News Live Update : शिरुर तालुक्यात बिबट्या जेरबंद; तीन बळींच्या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक

Shukra Transit: २६ नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीत राहणार शुक्र; मेष, वृषभसह 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव

Nashik Crime : कार्तिकी एकादशीला अवैधरीत्या दारू विक्री! महागड्या कारसह साडेसात लाखांचा मद्यसाठा जप्त, एकाला अटक

SCROLL FOR NEXT