thief 2.jpg 
नाशिक

येवल्यात एका रात्रीत नागरिकांना धक्का! चोरट्यांचा आश्चर्यकारक विक्रम

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : मंगळवारी (ता. २०) मध्यरात्री येवला तालुक्यातील रहाडी व खरवंडी इथल्या नागरिकांना धक्का बसला. याचे कारण इथे एका रात्रीत चोरट्यांनी आश्चर्यकारक विक्रम केला. यामुळे परिसरात सध्या भितीचे वातावरण आहे.

एका रात्रीत चोरट्यांचा विक्रम
मंगळवारी (ता. २०) मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान तालुक्यातील रहाडी व खरवंडी येथे चोरट्यांनी तब्बल नऊ ठिकाणी घरफोड्या करत धुमाकूळ घालत रोख रक्कम, सोने-चांदीचा ऐवज, मोबाईल संच आणि दुचाकी असा ऐवज चोरून नेला आहे. रहाडी येथील बाबासाहेब गायकवाड यांच्या वस्तीवर गायकवाड कुटुंब रात्री वीज नसल्याने पडवीत झोपले असताना महिलेच्या गळ्यातील अंदाजे ३० हजार रुपयांची सोन्याची पोत चोरट्यांनी चोरून नेली.

दीड तोळे सोने चोरले

शेजारील अशोक गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी, तसेच सोपान गायकवाड यांच्या मालकीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. त्याच रात्री चोरट्यांनी रहाडी गावातील सिद्धार्थ रोकडे हा घराच्या पडवीत झोपला असताना त्याच्या उशाखालील दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. त्याच मध्यरात्री चोरट्यांनी रहाडी गावातील शेख वस्तीवर मोर्चा वळवत अमीन उस्मान शेख यांचा घरात प्रवेश करत लोखंडी पेटीतील २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच रसूल शेख यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील एक तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले. त्यानंतर सद्दाम महेमूद शेख यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील दीड तोळे सोने चोरून नेले.  

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 
रहाडी गावातच एकाच रात्री आठवी चोरी करण्याचा विक्रमही चोरट्यांनी केला. आसाराम गांगुर्डे हे घराबाहेर अंगणात झोपले असताना त्यांच्याकडील एक हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. रहाडी गावाजवळ असलेल्या खरवंडी गावातील दत्तू संपत आहेर यांच्या घरातील पेटीतील अडीच तोळे सोने व सहा हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरट्यांनी एकाच रात्री एकूण नऊ ठिकाणी चोरी करून डल्ला मारल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे व उज्ज्वलसिंग राजपूत यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसानी यातील सात चोऱ्यांचे गुन्हे दाखल केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT