Recovery of over Rs 2.5 crore from additional hospital bills nashik marathi news 
नाशिक

हॉस्पिटलच्या अतिरिक्त बिलांतून अडीच कोटींहून अधिक रिकव्हरी; लेखापरीक्षकांकडून हजारो रुग्णांना दिलासा 

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांवर उपचाराअंती आकारल्या जाणाऱ्या अव्वाच्यासव्वा बिलांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांनी तब्बल दोन कोटी ६९ लाख २८ हजार रुपये रिकव्हरी करून नऊ हजार ९३ रुग्णांना आर्थिक दिलासा दिला आहे. 

मार्चमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. एप्रिल व मेमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर सातत्याने रुग्ण वाढू लागले. जून ते सप्टेंबरमध्ये रुग्णांची संख्या वाढली. दररोज हजारांच्या पटीत रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नव्हत्या. नाईलाजाने खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागली. कॉर्पोरेट हॉस्पिटलसह छोट्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण वाढू लागल्यानंतर बिलासंदर्भात तक्रारी वाढल्या. याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला. त्यानंतर महापालिकेने रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. १०७ हॉस्पिटलमध्ये १०७ लेखापरीक्षकांची नियुक्ती केल्यानंतर एकूण खाटांपैकी ८० टक्के रुग्णांची बिले तपासण्यास सुरवात झाली. गेल्या अडीच महिन्यात लेखापरीक्षकांना बिल कमी करण्यात यश आले. 

सोळा हजार रुग्णांची तपासणी 

खासगी रुग्णालयांमधून आतापर्यंत सोळा हजार ६५१ रुग्ण तपासण्यात आले. त्यातील नऊ हजार ९३ रुग्णांची बिले तपासण्यात आली. यात दोन कोटी ६९ लाख २८ हजार ७९ बिलांची रिकव्हरी काढून तेवढी रक्कम रुग्णालयांना परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशी माहिती महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे यांनी दिली. डिस्चार्ज मिळालेल्या सात हजार ५५८ रुग्णांच्या मेडिक्लेम पॉलिसी होत्या.  

संपादन - रोहित कणसे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या महत्त्वाची बैठक

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

SCROLL FOR NEXT