नाशिक

Nashik News : रेल्वे पोलिसांकडून मुलांचे पुनर्वसन; चारही प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्हीची देखरेख

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महिनाभरापूर्वी मनमाड रेल्वे स्थानकावर ६५ मुले संशयास्पद आढळल्यामुळे सध्या नाशिक रोड रेल्वे पोलिस रेल्वे स्थानकावर अलर्ट झाले आहेत. रेल्वे पोलिस रेल्वे स्थानकावर फिरणाऱ्या मुलांची चौकशी करीत असून महिनाभरात आजपर्यंत सहा मुले पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. (Rehabilitation of Children by Railway Police nashik news)

नाशिक रोड रेल्वेस्थानक हे उत्तर महाराष्ट्रातले मुख्य रेल्वे स्थानक म्हणून समजले जाते. या स्थानकावर रोज ४६ गाड्या मार्गक्रमण करतात. रेल्वे पोलिस सध्या एकटे फिरणाऱ्या मुलांची चौकशी करीत असून, गरज भासल्यास त्यांना चाइल्ड लाईनच्या स्वाधीन करीत आहे. मुलांच्या चौकशीतून पालकांचा शोध लागल्यास तत्काळ त्यांच्या पालकांना संपर्क करून त्यांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सध्या रेल्वे पोलिस राबवत आहे.

यामुळे रेल्वे स्थानकावर पळून आलेली मुले, अनाथ मुले, पालकांना सोडून आलेल्या मुलांचे पुनर्वसन होत आहे. रेल्वे पोलिस स्थानकासह मार्गक्रमण करणाऱ्या गार्डनमध्ये कडेकोट बंदोबस्त राबवत आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर चार प्लॅटफॉर्म आहे. चारही प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्हीची नजर असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आरपीएफच्या कार्यालयांतर्गत जवळपास ९० कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. चौथ्या प्लॅटफॉर्मवर अनाथ गरीब व घर सोडून भरकटत आलेल्या मुलांवर काम करणारी चाइल्ड लाईन संस्था कार्यालय आहे. ही संस्था शासनाच्या सौजन्याने सध्या काम करीत असून रेल्वे पोलिस वैयक्तिक या संस्थेच्या माध्यमातून या मुलांना पालकांपर्यंत पोचवण्याचे काम करीत आहे.

"रेल्वे स्थानकावर आढळलेल्या मुलांसह गाड्यांमध्ये एकटे फिरणाऱ्या मुलांचे आम्ही चौकशी करून त्यांना पालकांच्या स्वाधीन करतो. अनेक वेळा ही मुले उपाशी असतात. चाइल्ड लाईन त्या सौजन्याने या मुलांचे पुनर्वसन आम्ही करीत असतो." - महेश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, रेल्वे पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT