Four square at city
Four square at city esakal
नाशिक

Nashik : अपघाती जागांवरील उपायांकडे दुर्लक्षपणा भोवला

नरेश हाळणोर

नाशिक : शहर हद्दीमध्ये अपघातांना आळा घालण्यासाठी सुरक्षिततेसंदर्भात उपाययोजना केल्या जातात. मात्र या उपाययोजनांची अंमलबजावणी होत नाही. शहरातील बहुतांशी चौकांमध्ये पांढऱ्या रंगाचे झेब्रा पट्टे नाहीत. आवश्‍यक असलेल्या ठिकाणी गतिरोधक नाहीत. २४ तास सिग्नल यंत्रणा सुरू नसतात. परंतु भरधाव वाहनांच्या वेगाला मर्यादा घालण्यासाठी याच उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात.

गेल्या शनिवारी (ता. ८) घडलेल्या बस-ट्रकमधील भीषण अपघातानंतरही प्रशासनाने काही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. अद्यापही अनेक चौकांमध्ये उपाययोजनाच नसल्याने भरधाव वाहने धावतच आहेत. (Remedies at accident site neglected causes accident Nashik Latest Marathi News)

नाशिक शहराच्या हद्दीतून मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक-औरंगाबाद आणि नाशिक-पुणे हे राज्य महामार्ग, तर नाशिक-दिंडोरी, नाशिक-त्र्यंबक, नाशिक-पेठ ही जिल्ह्यांतर्गत मार्ग आहेत. या साऱ्याच मार्गांवर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रहदारी वाढते आहे. तसेच शहरांतर्गत रस्त्यांवरही वाहनांची रहदारी वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही दिवसागणिक वाढत आहेत.

बाजारात दाखल होणाऱ्या नवनवीन वाहनांमध्ये वेगाची मर्यादाही वाढविण्यात आलेली आहे. त्या तुलनेत रस्त्यांची मात्र अबाळ आहे. यातून अपघात वाढतात. त्यावर पोलिस वाहतूक शाखा, महापालिका आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अपघाती स्थळांवर उपाययोजनांचा आराखडा बनविला जातो. पोलिसांकडून चौकांमध्ये झेब्रा, गतिरोधक, सिग्नल, सिग्नलची दुरुस्ती, सूचना फलक, दिशादर्शक फलक यासंदर्भात प्रस्ताव महापालिका प्रशासनाला केली जाते. त्यानुसार, मनपा प्रशासनाकडून सदरच्या उपाययोजना करून देणे आवश्‍यक असताना, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

परिणामी, आजमितीस शहरातील बहुतांशी चौकांमध्ये पांढऱ्या रंगांचे झेब्रा क्रॉसिंग नाहीत. अपघाती स्थळ असेल, तर त्याठिकाणी गतिरोधक, रम्पल स्ट्रीप, टेबल टॉप गतिरोधक यांसारख्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी सूचना फलक, दिशादर्शक फलकांची वानवा आहे. या साऱ्या उपायांचा अभाव असल्यास अपघाताची शक्यता अधिक वाढते.

...तर अपघात टळला असता

शनिवारी (ता. ८) औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर झालेला बस-ट्रकमधील भीषण अपघात टाळता आला असता. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गतिरोधक नाही. पहाटेला सिग्नल यंत्रणा ब्लिंकर (फक्त पिवळा लाइट सुरू असणे) असतो. त्यामुळे दोन्हीही वाहने त्यांच्या दिशेने वेगात आले. चौफुली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचठिकाणी गतिरोधक असते तर वाहनांचा वेग कमी होऊन चौकातून वाहन सावकाश होऊन दोन्ही वाहनचालकांना वाहने दिसली असती आणि अपघात टाळता आला असता.

ब्लॅक स्पॉट (अपघाती स्थळ)

गेल्या तीन वर्षांत एकाच ब्लॅक स्पॉटवर अपघात होऊन पाच वा त्यापेक्षा अधिक बळी वा गंभीर जखमी असल्यास त्या स्पॉटला ब्लॅक स्पॉट (अपघाती स्थळ) म्हटले जाते. यात घट झाल्यास ब्लॅक स्पॉटमधून ते अपघातस्थळ वगळण्यात येते. आजमितीस नाशिक शहर हद्दीमध्ये १५ ब्लॅक स्पॉट आहेत.

शहरातील ब्लॅक स्पॉट (२०२१ नुसार)

ट्रक टर्मिनल (आडगाव), रासबिहारी चौफुली, शिंदे गाव, द्वारका सर्कल, फेम सिग्नल, राऊ हॉटेल सिग्नल, के. के. वाघ कॉलेज, जत्रा हॉटेल चौफुली, उपनगर नाका सिग्नल, चेहेडीगाव फाटा, दत्तमंदिर सिग्नल, तारवालानगर सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, एक्स्लो पॉइंट (अंबड-सातपूर लिंक रोड), पळसेगाव बस स्टॉप.

घटलेले ब्लॅक स्पॉट

शरणपूर रोड सिग्नल, वेद मंदिर चौक, स्टेट बँक चौक (लेखानगर),

नांदूर नाका सिग्नल, मिरची हॉटेल सिग्नल, जुना गंगापूर नाका सिग्नल.

वाढलेले ब्लॅक स्पॉट

पळसे बस स्टॉप, ट्रक टर्मिनल (आडगाव), एक्स्लो पॉइंट (अंबड-सातपूर लिंक रोड)

तत्काळ उपायांची गरज

महापालिका हद्दीमध्ये प्रत्येक मोठ्या चौफुलीवरील चारही रस्त्यांवर टेबल टॉप गतिरोधक बसवावे. वेगात आलेल्या वाहनचालकाला आपला वेग मर्यादित करणे भाग पाडण्यासाठी उपनगरीय चौफुलीवर रॅम्पल स्ट्रीप गतिरोधक बसवावे. प्रत्येक चौकात पांढऱ्या रंगाचे झ्रेबा क्रॉसिंग पट्टे असावेत. सिग्नल व्यवस्थेची मागणी असल्यास त्यावर तत्काळ निर्णय होऊन ते बसवावे. नादुरुस्त सिग्नल यंत्रणा तत्काळ सुरू करावेत.

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी.

सुरक्षा वाहतूक समिती नावालाच महापालिका, उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतूक पोलिस शाखा यांची संयुक्त प्रतिनिधींची सुरक्षा वाहतूक समिती असते. या समितीकडून ठराविक कालावधीनंतर शहरातील रस्त्यांची पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय घेतले जातात. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवरील उपायांकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षपणा पाहता, सदरील समिती नावालाच असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sudhakar Badgujar: ठाकरेंचे खंदेसमर्थक बडगुजरांना तडीपारीची नोटीस; ऐन निवडणुकीच्या काळात शहर पोलिसांची कारवाई

Rohit Vemula: "आरोपींना शिक्षा होणारच!" रोहित वेमुला मृत्यूप्रकरणी CM रेवंथ रेड्डींचा इशारा

Tu Bhetashi Navyane: मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर; ‘तू भेटशी नव्याने’च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Google Wallet Launch : 'गुगल पे' अन् 'गुगल वॉलेट' एकसारखं नाही! दोन्हीमध्ये काय आहे फरक?

Latest Marathi News Live Update : आंबेगाव, जांभूळवाडी- कोळेवाडी परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT