Shinde-Fadanvis Esakal
नाशिक

Nashik: कृषी, औद्योगिक, पर्यटनाचा 3 महिन्यात अहवाल द्या; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik : नाशिक जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी कृषी, औद्योगिक व पर्यटनाविषयी आराखडा तयार करून तीन महिन्यात राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. (Report on agriculture industrial tourism in 3 months Instruction of Chief Minister Deputy Chief Minister Nashik news)

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी (ता.२४) मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची संवाद साधला. जिल्ह्याचा शाश्वत विकास हा तेथील कृषी, औद्योगीक व पर्यटन या घटकांवर अवलंबून असतो.

त्यामुळे या तिन्ही घटकांवर आधारित विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश बैठकीत दिले. या तिन्ही विभागांच्या माध्यमातील विकासाच्या दृष्टीने सकारात्मक आणि उणिवांचा शोध घ्यायचा आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच भविष्याच्या दृष्टीने या तिन्ही विभागांच्या माध्यमातून विकासासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर अहवाल तयार करायचा आहे. त्यामुळे भविष्यात नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे.

जिल्ह्याचा शाश्वत विकास आराखडा तयार करण्यासाठीची जबाबदारी राज्य शासनाने जिल्हा नियोजन विभागावर सोपविण्यात आली आहे. आराखडा बनविण्यासाठी त्रयस्थ कंपनीची मदत प्रशासन घेणार असल्याची माहिती मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT