sarpanch 
नाशिक

सिन्नरला ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षणाची येत्या सोमवारी सोडत   

अजित देसाई

 सिन्नर (नाशिक) : २०२१ ते २०२५ दरम्यान निवडणुका होणाऱ्या तालुक्यातील सर्व ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत १४ डिसेंबरला तहसील कार्यालयात सकाळी दहाला काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. 

तालुक्यातील सुमारे १०० ग्रामपंचायतींची मुदत गेल्या मार्च ते ऑगस्टदरम्यान संपली असून, कोरोनामुळे निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. या निवडणुका आता नवीन वर्षात घेण्याचे नियोजन आहे. तालुक्यात असणाऱ्या सर्व ११४ ग्रामपंचायतींच्या २०२१ ते २०२५ या कालावधीत पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी कोणत्या प्रवर्गातील व्यक्ती विराजमान होणार याची निश्चिती सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकांना नव्या वर्षात मुहूर्त लागणार असल्याने गावोगावीचे इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. मातब्बरांसोबतच अनेकांच्या नजरा सरपंच आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. 

असे असेल आरक्षण 
११४ ग्रामपंचायतींसाठी सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात येईल. अनुसूचित जाती ७, अनुसूचित जमाती १४, इतर मागास प्रवर्ग ३०, तर सर्वसाधारण ६३ याप्रमाणे सरपंचपद आरक्षण असेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT