Dattaraj Chhajed esakal
नाशिक

Nashik : भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा! नांदगावच्या दत्तराज छाजेड यांच्या निर्णयाने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : येथील भारतीय जनता पक्षाचे जुने, निष्ठावान कार्यकर्ते दत्तराज छाजेड यांनी पक्षाच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाचा आज सायंकाळी राजीनामा दिल्याने भाजपच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांना त्यांनी पदाचा राजीनामा सोपविताना पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राहणार असल्याचे कळविले आहे. एकच तालुक्याला तीन तालुकाध्यक्षांची नियुक्ती कशी असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या तालुकाध्यक्ष पदासाठीचे तीन मंडळात विभाजन करून नव्याने तीन जणांची नवे तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाली. जिल्ह्यात अन्य ठिकाणी एकच तालुकाध्यक्ष नेमण्याची प्रथा असताना नांदगाव बाबतीत भाजपाने एकाच पदावर तिघांची नियुक्ती केल्याने छाजेड यांनी आक्षेप नोंदविली आहे.

तिघा मंडळासाठी सुचविण्यात आलेली उमेश उगले, स्वप्निल शिंदे व विक्रम निकम यांची नावे डावलण्यात आल्याने आपल्या व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षातल्या नवनियुक्त्यांच्या खेळीवर हरकत नोंदवून भाजप वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसमोर जाताना कसे जायचे असा सवाल त्यांनी उपस्थितीत करताना पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या या धोरणाविरोधात थेट रणशिंग फुंकले आहे.

दरम्यान श्री. छाजेड यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे, की जाहीर झालेल्या नाशिक जिल्हा कार्यकारिणी निवडीत व मंडल अध्यक्ष निवडीत सूचित केलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे मी उपरोक्तपदाचा राजीनामा देत आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षापासून पक्षाचे पोस्टर चिटकवण्यापासून झेंडे लावण्यापर्यंत लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंढे यांच्यापासून ते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांच्या नांदगाव तालुक्यातील सभांचे संचलन करण्याची जबाबदारी पार पाडली.

युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, दोन टर्म नांदगाव तालुकाध्यक्ष, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे भूषविण्याची संधी पक्षाने दिली. माझ्या कार्यकाळात तालुक्यातून तीन लोकसभांमध्ये सर्वाधिक मते पक्षाला मिळाली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कमळ फुलले. बूथ रचनेत सर्व मंडलात उत्कृष्ट बूथ रचना व पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्गाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी सन्मानित केले.

याकरिता मी पक्षाचा ऋणी आहे. पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून अंतिम श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT