sikhe india festival esakal
नाशिक

Nashik News : सिखेच्या इंडिया उत्सवात 300 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करण्याचा उद्देश सफल करण्याच्या अनुषंगाने सिखे संस्थेच्या शैक्षणिक पद्ध्ती फारच उपयुक्त ठरत आहेत. (response of 300 students to sikhe institute india festival Teacher Innovator Program nashik news)

यामुळे केवळ अध्ययन स्तरातच वाढ होत नाही तर विद्यार्थ्यांची समज दृढ होते असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक, प्राचार्य अनिल गौतम यांनी केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव केंद्रात आयोजित विद्यार्थी प्रदर्शनीत ते बोलत होते.

शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक आणि सिखे संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या (TIP) टीचर इनोव्हेटर कार्यक्रमांतर्गत शिकलेल्या भाषा आणि गणित विषयांच्या पद्ध्तीच्या आधारावर विविध प्रकारचे मोडेल तयार करून वर्ग 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांनी सादर केले.

हा शैक्षणिक सोहळा जि. प. केंद्र प्राथमिक शाळा टाके देवगाव येथील शाळेत घेण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रातील 11 शाळेतील 285 विद्यार्थी, 50 शिक्षक, 50 हून अधिक पालक सहभागी झाले होते.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

TIP कार्यक्रमात भाषा आणि गणित विषयाच्या शिकविण्याच्या विविध नाविन्यपूर्ण पद्धतीचे प्रशिक्षण शिक्षकांना दोन टप्प्यात देण्यात आले. त्यानंतर शिक्षकांनी या सर्व पद्ध्ती विद्यार्थ्यांसोबत वर्गात घेतल्या ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात वाढ होण्यास मदत झाली. सोबतच सिखे संस्थेने विद्यार्थ्यांना दिलेल्या कार्यपुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांना सराव करण्यास अधिक संधी मिळाली.

विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेत या सर्व पद्धतींवर आधारित मोडेल तयार करून कार्यक्रमात प्रदर्शित केले. विद्यार्थी अभिव्यक्त होत आहेत,शिकलेल्या गोष्टी आपल्या शब्दात मांडत आहेत याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक प्राचार्य श्री.अनिल गौतम यांनी आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश झोले, डाएट अधिव्याख्याता जगन्नाथ दरंदले, त्र्यंबकेश्र्वर बीआरसी विषय सहायक प्रमोद गाढे, केंद्रप्रमुख अशोक बोराडे, मुख्यध्यापक दशरथ शिंदे सिखे राज्य समन्वयक वर्षा परचुरे व सिखे नाशिक जिल्हा समन्वयक आकाश ढेपे, सीखे प्रशिक्षक शेखर साळुंखे व निवृत्ती सोळे, गावाचे सरपंच पर्वताताई झोले, पांडुरंग झोले, मधुकर झोले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिखे नाशिक जिल्हा समन्वयक आकाश ढेपे यांनी केले तर सूत्रसंचालन जि. प. प्राथमिक शाळा टाकेदेवगाव सहायक शिक्षक संजय चव्हाण यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT