police esakal
नाशिक

Nashik Police Transfer : सहायक पोलिस आयुक्तांमध्ये फेरबदल; अंकुश शिंदे यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Transfer : शहर पोलिस आयुक्तालयात बदली होऊन आलेल्या सहायक पोलिस आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये नव्याने फेरबदल केले आहेत. आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये हे बदल करण्यात आले.

यात, डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे शहर गुन्हे शाखा, सचिन बारी यांच्याकडे विशेष शाखेसह शहर वाहतूक शाखेची अतिरिक्त जबाबदारी तर, सोमनाथ तांबे यांच्याकडे पोलिस मुख्यालय-प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Responsibilities of transferred Assistant Commissioner of Police have been reshuffled nashik news)

गेल्या महिन्यात महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या जाहीर झाल्या होत्या. यात शहर आयुक्तालयासाठी पाच सहायक पोलिस आयुक्तांचा समावेश होता. त्यानुसार, पदोन्नतीने डॉ. सीताराम कोल्हे, नितीन जाधव, सचिन बारी, सोमनाथ तांबे आणि शेखर देशमुख यांनी नाशिक आयुक्तालयात रुजू झाले होते.

डॉ. कोल्हे यांच्याकडे पोलिस मुख्यालय-प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली होती. तर, सचिन बारी हे रुजू झाल्यानंतर विशेष शाखा, शेखर देशमुख यांच्याकडे अंबड विभागाची तर, नितीन जाधव यांच्या वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर, नाशिक ग्रामीणमधून जूनअखेरीस रुजू झाले होते. नवीन सहायक आयुक्त रुजू झाल्यानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल केले आहेत.

नवीन आदेशानुसार, डॉ. कोल्हे यांच्या शहर गुन्हे शाखा, तर सोमनाथ तांबे यांच्याकडे पोलिस प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली.

त्याचप्रमाणे, नितीन जाधव यांच्याकडे पंचवटी विभागाची जबाबदारी सोपविली तर, सचिन बारी यांच्याकडे विशेष शाखेसह शहर वाहतूक शाखेची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. शेखर देशमुख यांच्याकडील अंबड, अंबादास भुसारे यांच्याकडील नाशिकरोड आणि सिद्धेश्‍वर धुमाळ यांच्याकडील सरकारवाडा विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

SCROLL FOR NEXT