manja esakal
नाशिक

नायलॉन मांजा वापराल तर होईल तुरुंगवास - पो. आयुक्त नाशिक

पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरल्यास गुन्हे दाखल होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरात चिनी नायलॉन मांजा (Chinese nylon manja) वापरास प्रतिबंध करणारा आदेश शहर दंडाधिकारी व पोलिस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pandey) यांनी लागू केला आहे. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरल्यास गुन्हे दाखल होणार आहेत.

नायलॉन मांजाने घेतलेत निष्पापांचे बळी

जानेवारी महिन्यात मकर संक्रातीला तिळगुळ देण्यासोबत पतंग उडवण्याला बहर येतो. या काळात शहरात पतंग उडविण्याच्या छंदापायी अनेक दुचाकी वाहनचालकांचे आणि मुक्या पक्ष्यांचे बळी गेले आहेत. नायलॉन कोटींगच्या टोकदार मांजा गळ्याभोवती आवळला गेल्याने चालू वाहनावर पडून महिला आणि पुरुष वाहनधारकांचे जीव गेले आहेत. दरवर्षी घडणाऱ्या या अघटित घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी पतंग उडविण्यासाठी नायलॉन दोरा, चायनीज मांजा यांच्या निर्मिती, साठा आणि वापरावर बंदी घातली आहे. मंगळवारी (ता. ४) मध्यरात्री पासून ३१ जानेवारीपर्यत चायनीज आणि नायलॉन मांजा वापराला प्रतिबंध केला आहे.

...तर तुरुंगवास

प्रतिबंध असलेला नॉयलॉन मांजा वापराच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम (१३५) (१) नुसार गुन्हा दाखल होऊन एक वर्षाच्या कैदेची शिक्षेची तरतूद आहे. पोलिस आयुक्तांनी शहरातील सगळ्या पोलिस ठाण्यांना आदेशानुसार कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT