woman principal.png 
नाशिक

मुख्याध्यापिका कि वैरिण! चक्क गरिबांच्या मुलांच्या घशातील चोरला तांदूळ; गलेलठ्ठ पगार असूनही असे कृत्य

भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि.नाशिक) : मुख्याध्यापिकेने चक्क चालकाशी संगनमत करून पोषण आहारातील पंधरा क्विंटल तांदूळ शाळेत न आणता परस्पर उतरवून घेतल्याचे स्पष्ट झाले. ही कुणकुण संस्थेच्या कार्यकारी मंडळाला लागल्यानंतर मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करीत असतानाच धाड टाकली. आणि मग...

मुख्याध्यापिका कि वैरिण! 

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने शालेय पोषण आहारातील पंधरा क्विंटलचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्याने संस्थेच्या मॅनेजमेंट कमिटीने मुख्याध्यापिका जयश्री गोळेचा-लाख यांना रंगेहाथ पकडून तत्काळ निलंबित केले. तर गलेलठ्ठ पगार असतानाही गरिबांच्या मुलांच्या घशातील तांदूळ चोरल्याने पालकांमध्ये तीव्र संताप असून, या मुख्याध्यापिकेसह संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. 

मुख्याध्यापिका कि वैरिण; चालकाशी संगनमत करून केली गफलत

नेमिनाथ जैन संस्थेच्या अनुदानित श्री नेमिनाथ जैन प्राथमिक विद्यामंदिर शाळेत एकूण ८३४ विद्यार्थी शिकतात. या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहार व शिजवत वाटप होतो. नेहमीप्रमाणे पोषण आहारातील तांदळाचा पुरवठा करणाऱ्या तिरुपती सप्लायर एजन्सीचे वाहन (एमएच १४, एएच ६९१०)चालकाने संस्थेच्या प्राथमिक शाळेत पोषण आहारातील तांदूळ आणला. त्याने पन्नास किलो वजनाच्या ७१ गोण्या उतरवल्या. वास्तविक, नियमानुसार पन्नास किलो वजनाच्या १०१ गोणी तांदूळ शाळेत पुरवठा करावयास हवा होता. असं असतानाही या मुख्याध्यापिका जयश्री गोळेच्या यांनी संबंधित चालकाला १०१ गोणी शाळेत या एजन्सीने पुरवठा केल्याची पोचपावती दिली. यावरून या मुख्याध्यापिकेने चालकाशी संगनमत करून पोषण आहारातील पंधरा क्विंटल तांदूळ शाळेत न आणता परस्पर उतरवून घेतल्याचे स्पष्ट झाले.

कुणकुण मंडळाला लागल्यानंतर टाकली धाड

ही कुणकुण संस्थेच्या कार्यकारी मंडळाला लागल्यानंतर मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करीत असतानाच धाड टाकली. या वेळी एका विद्यार्थ्याला सहा किलो तांदळाचे वाटप करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात एका विद्यार्थ्याला चार ते साडेचार किलोच तांदूळ वाटप करीत असल्याचे निदर्शनास आले. मुख्याध्यापिकेने कार्यकाळात आणखी काही गैरव्यवहार केले आहेत का, हे तपासण्यासाठी संस्थेने चौकशी सुरू केली आहे. 
 

प्राथमिक चौकशीत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री गोळेचा या दोषी आढळल्या आहेत. चौकशी सुरू असून, चौकशीअंती संबंधित संस्थेस मुख्याध्यापिकेविरुद्ध कारवाईबाबत नियमानुसार आवश्यक ते निर्देश देऊन कारवाईच्या सूचना दिल्या जातील. -राजेंद्र निकम, गटशिक्षणाधिकारी, चांदवड 

मुख्याध्यापिकेविरोधात विद्यार्थी व पालकांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कारवाई होईल. संस्थेत गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. -झुंबरलाल भंडारी, जॉइंट सेक्रेटरी, नेमिनाथ जैन संस्था, चांदवड 

संबंधित निलंबित मुख्याध्यापिकेने वाहतूकदाराशी संगनमताने १५ क्विंटल तांदळाचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. असा गैरप्रकार कोणत्याही शाळेच्या बाबतीत खपवून घेणार नाही. अधिक पुरावे मिळाल्यास संस्थेला संबंधित मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले जातील. -श्रीधर देवरे, अधीक्षक, शालेय पोषण आहार योजना, जिल्हा परिषद नाशिक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT