Teacher Ratan Chaudhary while threshing rice with the help of a two-wheeler as labor was not available for threshing rice. esakal
नाशिक

Nashik News : दुचाकीच्या सहाय्याने शिक्षकाकडून भात मळणी! आदिवासी भागातील मजुरांच्या स्थलांतराचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

पळसन (जि. नाशिक) : आदिवासी भागातील मजूर, कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत असल्याचा फटका स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनाही बसतो.

मात्र, त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न म्हणून येथील एका शिक्षकाने नामी शक्कल लढवीत चक्क दुचाकीच्या सहाय्याने भात मळणी केली. (Rice threshing by teacher with help of bicycle Effect of labor migration from tribal areas Nashik News)

सुरगाणा तालुका हा पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ्यात तालुक्यात सरासरी दीड हजार मिलिमीटर पाऊस पडतो. हे पाणी पश्‍चिम वाहिनी नद्यांद्वारे लगतच्या अरबी समुद्राला जाऊन मिळते. याच पावसाच्या प्रदेशात उन्हाळ्यात निम्म्या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

त्यामुळे भात, नागली, वरई या खरीप पिकांची लागवड झाली, की आदिवासी भागातील गावे ओस पडू लागली आहेत. मजुरांनी अन्य कामांच्या शोधासाठी स्थलांतर केल्याने भात मळणी, खांडणी, राब भाजणी आदी कामांचा खोळंबा होत आहे.

त्यातून मार्ग काढताना येथील शिक्षक रतन चौधरी यांनी दुचाकीच्या सहाय्याने मळणीचा प्रयोग केला. अवघ्या तीन ते चार लिटर पेट्रोलच्या सहाय्याने दिवसभरात पंचवीस ते तीस पोते भात मळणी करता येते.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

भाताच्या पेंढ्या (पुळ्या) बांधून रचून ठेवलेल्या उडवीची मळणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. श्री. चौधरी म्हणाले की, खळ्यावर गोलाकार भाताच्या पेढ्यांतील ओंबी समोरासमोर रचून घेत, त्यावर दुचाकी गोलाकार फिरवल्यास दाणे ओंबीहून तत्काळ वेगळे होतात.

उजव्या व डाव्या बाजूने आलटून पालटून पंधरा ते वीस गोलाकार फेरे मारावेत. एकाच बाजूने दुचाकी फिरवू नये. कारण, त्यामुळे चक्कर, भोवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे काम वीस ते पंचवीस मजूर करतात, तेच काम अवघे चार ते पाच मजूर दिवसभरात करू शकतात.

त्यामुळे आर्थिक समस्येबरोबरच मजूरटंचाईवरही मात करता येते. कृषी विद्यापीठाने यासारखेच संशोधन करीत व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना परवडणारे साधन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT