lady thieves esakal
नाशिक

Crime Alert : रिक्षा-बस प्रवासात लुटणारी महिलांची टोळी सक्रिय

नरेश हाळणोर

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात रिक्षा आणि शहर बस प्रवासादरम्यान महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने (Jewelry), रोकड, असा ऐवज हातोहात लंपास (Stolen) करणारी महिलांची टोळी (Lady Thieves) सक्रिय झाली आहे. या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. आठवडाभरामध्ये एक-दोन नव्हे त्यापेक्षा अधिक घटनांमध्ये रिक्षा आणि शहर बस प्रवासात संशयित महिलांनी सोन्याचे दागिने लंपास करण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. (Rickshaw bus robbery Lady gang active Nashik Crime alert News)

दोन- तीन महिलांपेक्षा जास्तीच्या संख्येने एकावेळी येथून या महिला चोरी करीत असतात. गेल्या आठवड्यात रिक्षात प्रवास करणाऱ्या दोन घटनांमध्ये दोन महिलांच्या पर्समधून लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. तर, शहर बस प्रवासादरम्यान, एका महिलेचेही सोन्याचे दागिने व रोकड या चोरट्या महिलांनी हातोहात लंपास केले आहे. यासंदर्भात पंचवटी, मुंबई नाका, भद्रकाली, अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु, अद्याप यातील एकाही गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावरच संशय व्यक्त होत आहे. पोलिसांचा गुन्हे शोध विभागही या महिला टोळीला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.

अंबड पोलिसात मुंबईहून आलेल्या एकाच्या बॅगेतील साडेचार लाखांचा ऐवज अशाच महिलांच्या टोळीने लंपास केला आहे. निवृत्ती लोखंडे (रा. आंबेडकरनगर, घाटकोपर) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या १ जुलै रोजी घाटकोपर येथून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे जाण्यासाठी पिकअप वाहनातून प्रवास करीत होते. या वेळी त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रोकड असा ४ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज हातोहात लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य गुन्ह्यांप्रमाणे याही गुन्ह्यातील संशयितांना जेरबंद करण्यात आलेले नाही.

परजिल्ह्यातील टोळीची शक्यता

रिक्षा व बसप्रवासात ऐवज लंपास करणारी ही महिलांची टोळी परराज्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. रिक्षामध्येही दोन वा तीन महिला आधीच बसलेल्या असताना या महिला हात सफाईने ऐवज लंपास करतात. बस प्रवासातही गर्दीचा फायदा घेऊन संशयित टोळी बॅग वा पर्समधील ऐवज चोरून नेतात. या टोळीतील महिला ज्वेलरी दुकानांमध्येही जाऊन हातोहात दागिने लंपास करतात. काही दिवसांपूर्वी सराफी दुकानात असाच प्रकार घडला असता संशयित महिलांना पकडण्यात यश आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांतील एकाही गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

SCROLL FOR NEXT