crime23.jpg 
नाशिक

अखेर 'त्या' रिक्षा प्रवासी लुटीचा पर्दाफाश; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

सकाळवृत्तसेवा

नाशिक : रिक्षात सहप्रवासी बनून इतर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा मध्यवर्ती गुन्हे शाखेने पर्दाफाश करीत टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांनी शहरात चार गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी सांगितले. 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासास सुरवात

रुपेश कैलास भागवत (वय २६, खैरे गल्ली, भद्रकाली), मोईन मेहबूब शहा (२२, वडाळागाव), आरिफ सादिक शेख (३४, नानावली), नवशाद नजाकत खान (२०, समतानगर, टाकळी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० डिसेंबरला एका प्रवाशास रिक्षातील इतर प्रवाशांनी लुटल्याची घटना घडली होती. याआधीही याचप्रकारे प्रवासादरम्यान प्रवाशाकडील रोकड, दागिने चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या टोळीचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे शाखेस दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखेवर ही जबाबदारी सोपवत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासास सुरवात केली. संशयितांच्या रिक्षास क्रमांक दिसत नव्हता. 

चौघांविरुद्धात गुन्हा दाखल

दरम्यान, पोलिस शिपाई विशाल वाघ व अनिल शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयितांची टोळी रिक्षातून पंचवटीकडून त्रिमूर्ती चौकाकडे जात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे सापळा रचून रिक्षास अडवले. त्यातील चौघांनाही पकडून विचारपूस केली असता त्यांनी सरकारवाडा व मुंबई नाका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक-एक व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार चौघांनाही अटक करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक महेश शिंदे, कर्मचारी मिलिंद बागूल, सचिन आजबे, अतुल पाटील, युवराज कानमहाले, दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT