psycho while throwing stones at the bus esakal
नाशिक

Nashik News : भररस्त्यावर माथेफिरुचा धिंगाणा; बसवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : मंगळवारी (ता. १०) रात्री नाशिक रोडकडे प्रवासी घेऊन जाणारी सिटीलिंक बस (एमएच- १५- जीव्ही- ७७४८) सावतानगर बस स्टॉप येथे उभी होती.

या वेळी अचानक बसला भररस्त्यात अडवून एका माथेफिरूने चालकाला शिवीगाळ करीत थेट बसवर दगडफेक करीत बसची तोडफोड केली. या प्रकारामुळे चालक, वाहक व प्रवाशांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले. (riot of psycho on street Stone pelting at bus Nashik News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

भाजप पदाधिकारी ॲड. अतुल सानप यांनी तत्काळ पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत संशयितास ताब्यात घेतले. याप्रकरणी सिटीलिंक बसचालक सचिन दिलीप गायकवाड (३५, जयभवानी रोड) यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अंबड पोलिसांनी संशयित अतुल महादू देवरे (२६, रा. सावतानगर, सिडको) यास अटक केली आहे.

राणाप्रताप चौकात घरात घुसून पाच गावगुंडांनी दोघांना मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा सावतानगर सारख्या रहदारीच्या रस्त्यावर माथेफिरू थेट बसवर दगडफेक करत असल्याने या गावगुंडांवर पोलिस प्रशासनाचा धाकच उरला नसल्याच्या संताप जनक प्रतिक्रिया नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

आरपीआय आठवले गटाचे महानगरप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावरदेखील रहदारीच्या रस्त्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेस एक वर्ष पूर्ण होत आहे. अद्यापही या घटनेतील संशयित मोकाटच फिरत असल्याने अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक, बंगळूरस्थित कंपनीकडून घेतली लाच

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT