onion consumption 
नाशिक

हॉटेलमध्ये मिसळ, भेळमधून कांदा गायब; वाढत्या दरामुळे कांद्याऐवजी चक्क कोबीचा वापर

दत्ता जाधव

नाशिक/पंचवटी : बटाट्याने पन्नाशी तर कांद्यांने शंभरी गाठल्याने अनेक ठिकाणी घरगुती जेवणातून कांदा गायब झाला आहे. हॉटेलमधील मिसळ, भेळ आदींमधून कांदा गायब झाला आहे. काही व्यावसायिकांनी कांद्याला पर्याय म्हणून चक्क कोबीचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे. 

राज्यात जेवणात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय हॉटेल, घरगुती खाणावळी आदी ठिकाणीही कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण परतीच्या पावसाने कांद्यासह सर्वच पिकांची वाट लावली. त्यातच अनेक ठिकाणी चाळीतला कांदाही सडून गेल्याने कांद्याचा दर सर्वसामान्य ग्राहकांच्या कक्षेबाहेर गेल्याने अनेक महिलांनी घरगुती जेवणातून कांदा हद्दपार केला आहे तर काहींनी त्याचा वापर निम्म्यावर आणला आहे. सद्या बाजारात चांगल्या दर्जाच्या एक किलो कांद्यासाठी चक्क नव्वद ते शंभऱ रूपये मोजावे लागत आहेत. 

चक्क कांदा मिळणार नाहीचे फलक 

नाशिक शहर अन झणझणीत मिसळ आणि भेळभत्ता हे जुने समिकरण. मात्र सद्या कांद्याच्या वाढत्या दरामुळे अनेक भेळभत्ता विक्रेत्यांनी कांद्याऐवजी चक्क कोबीचा वापर सुरू केला आहे. भेळभत्ता पार्सल घेतलेतरी त्यासोबत कांदा दिला जात असे. आता मात्र उच्चांकी दरामुळे कांदा मिळणार नाही, असा चक्क फलकच काहींनी लावला आहे. 

ग्राहक तुटायला नको.... 

कांद्याच्या दराने शंभरी गाठल्याने अनेक ठिकाणी नाष्टा अन जेवणातून कांदा गायब झाला आहे. मात्र या परिस्थितीतही आपल्या हॉटेलचे नाव टिकवून ठेवण्याच्या धडपडीत अनेक व्यावसायिक ग्राहकांना खूष ठेवण्यासाठी मागेल तेवढा कांदा देतात. शहरातील मिसळ खवैय्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून शहराच्या परिसरात मिसळ खाण्याची ठिकाणे नव्याने सुरू झाली आहेत. अशा ठिकाणी सकाळपासून उशीरापर्यत मिसळ उपलब्ध असते. ग्राहकांची नाराजी नको म्हणून बहुसंख्य विक्रेते ग्राहक मागतील तेवढा कांदा देतात. यासाठी नफ्यात घट झाली तरी चालेल पण ग्राहक तुटायला नको, अशी भुमिका मखमलाबाद परिससरातील एका प्रसिद्ध मिसळ व्यावसायिकाने दिली. 

 

कांद्याचा भाव वाढलातरी ग्राहकांना कांदा द्यावाच लागतो. व्यवसायात टिकून राहण्यासाठी हॉटेलमधील पदार्थांच्या दरातही वाढ केलेली नाही. 
- रमेश निकम, संचालक हॉटेल राजहंस, भांडीबाजार 
 

कांदा बटाटे हे गृहिणींच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्यामुळे कितीही भाववाढ झालीतरी कांदे खरेदी करावेच लागतात, हे वास्तव आहे. मात्र गरजेपुरताच कांदा वापरते.  - ताराबाई माळेकर, गृहिणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे पुतळे नव्हेत तर स्मरण, भिडे गुरुजींसारखे गुरुजी छत्रपतींचा इतिहास तरुणांमध्ये रुजवतायत : मुख्यमंत्री फडणवीस

Kolhapur Rising addiction : फॅशनपासून व्यसनापर्यंतचा प्रवास: महाविद्यालयीन विद्यार्थिनी ‘स्मोकिंग-दारू’च्या विळख्यात, पालक हतबल

Latest Marathi News Live Update : 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, धुळे शहर हादरलं

Lionel Messi In India : लिओनेल मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार नाही; समोर आलं मोठं कारण...

Mobile Expire Alert: तुमचा मोबाईलही एक्स्पायर होतो? 90% लोकांना 'हे' माहितीच नाही

SCROLL FOR NEXT