road ( file phpto ) esakal
नाशिक

Nashik News : निफाड ड्रायपोर्टचा मार्ग अखेर मोकळा; शेतकऱ्यांची जमीन खरेदीचा निर्णय

निफाडमध्ये प्रस्तावित ड्रायपोर्टच्या उभारणीसाठी ‘निसाका’ची १०८ एकर जागा ‘जेएनपीटी’कडे सुपूर्द झाल्यानंतर आता रेल्वे, रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची साडेआठ एकर जागा खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निफाडमध्ये प्रस्तावित ड्रायपोर्टच्या उभारणीसाठी ‘निसाका’ची १०८ एकर जागा ‘जेएनपीटी’कडे सुपूर्द झाल्यानंतर आता रेल्वे, रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची साडेआठ एकर जागा खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यामुळे निफाड साखर कारखान्याच्या जागेवर ड्रायपोर्ट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(road to Niphad is open finally clean for transport nashik news)

‘निसाका’ची २५० एकरपैकी १०८ एकर जागा ही महसूल प्रशासनाने मोजणी करून ‘जेएनपीटी’ला हस्तांतरितही केली आहे. ‘जेएनपीटी’कडून त्यापोटी जिल्हा सहकारी बँकेला देय असलेले १०५ कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. आता रेल्वेलाइन, रस्ते यासाठी आवश्यक जागा शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे.

नगरविकास विभागाकडून तिची मोजणी प्रक्रिया पूर्ण होताच या जमिनीचे संपादन होईल. त्यासाठी आता जिल्हास्तरीय समितीकडून तेथील जागेची दर निश्चिती सुरू आहे. हे दर जाहीर होताच त्यानुसार ‘जेएनपीटी’ला ‘महसूल’कडून संपादनासाठी किती पैसे लागणार, याचा प्रस्ताव सादर होईल.

त्यात नियमित भूसंपादन करायचे की थेट खरेदी, अशा दोन्ही दरांचा प्रस्ताव दिला जाईल. त्यानुसार पुढील प्रक्रिया होईल. अद्याप मोजणी अन् तेथील जमिनींचे दरच प्राप्त झाले नसल्याची माहिती निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली.

दरम्यान, मात्र थेट खरेदीने जमिनींचे संपादन झाल्यास नियमित दराच्या एकपट अधिक म्हणजे बाजारभावाच्या पाचपट मोबदला संबंधित शेतकऱ्यांना मिळेल. त्यानंतर ‘जेएनपीटी’कडून ड्रायपोर्टचा डीपीआर तयार होईल. प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात होईल. सद्यःस्थितीत सुमारे ५०० कोटींची तरतूद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT