Rain Udpate Nashik news esakal
नाशिक

Rain Update : तासाभराच्या पावसात रस्ते पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (ता. ४) मुसळधार पावसाचे आगमन झाले. सायंकाळी पाचला तब्बल तासभर दमदार मुसळधार पावस कोसळला.

या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. पावसाचा वेग इतका होता की, कॉलेज रोड, सीबीएस, स्मार्ट रोडसह सगळ्या रस्त्यात पाणी साचल्याने हात धरून चालण्याची वेळ आली. (Roads under water in rain for an hour Nashik Latest Rain Update Marathi News)

दिवसभरात शहरात सुमारे २७ मिलिमीटर पाऊस झाला. परिणामी शहरभर ठिकठिकाणी पाणी साचले. जुलै महिन्यात शहर आणि जिल्ह्यात संततधार पावसाने पावसाचे सुमारे ८१ वर्षाचे विक्रम मोडीत काढीत जिल्ह्यातील धरण भरली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस असाच तीन- चार दिवस सुरू राहिल्यास भरलेल्या धरणातून विसर्ग सुरु करावा लागणार आहे.

स्मार्ट रोड पाण्यात

तासाभराच्या मुसळधार पावसाने कॉलेज रोडवर पाणीच पाणी साचले. सीबीएस परिसरात स्मार्ट रोडवर पाणी साचले. पाणी जाण्यास केलेले नाले कमी पडत असल्याने साठलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना परस्परांना आधार घेउन चालावे लागत. सिटी सेंटर मॉल, परिसरात पाण्याचा लोट साठला.

दहीपूल परिसरात नेहमीप्रमाणे पाणी साचू लागले. मात्र, स्थानिक व्यावसायिकांनी तातडीने रस्त्यावर केलेल्या भुयारी गटारीचे ढापे उघडले. काहींनी त्यावर कचरा दूर केल्याने तातडीने नदीत पाणी वाहून जाण्याचा वेगही वाढला. मात्र, अशाही स्थितीत साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

जागोजागी वाहतूक ठप्प

नाशिकमधून मराठवाड्याला जायकवाडी धरणासाठी आवश्यक तेवढा पाणीपुरवठा झाला. पावसाची संततधार चाललेल्या पावसाने जुलै महिन्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागविली तशी खरीप पिकांची सोय केली. त्यानंतर तब्बल आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर दमदार आगमन केले.

मागील महिन्याच्या संततधार पावसापेक्षा आजच्या पावसाचा जोर अधिक होता. मुसळधार स्वरूपाच्या या पावसाने सायंकाळी पाचला रस्त्यावरील विक्रेत्यांसह नागरिकांना उसंत न देता चिंब केले. काही वेळातच रस्त्याच्या दुतर्फा पावसाच्या पाण्याचे पाट वाहू लागले. रस्त्यावर वाहतूक काही वेळातच जागोजागी ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT