asha worker.jpg 
नाशिक

आशा, गटप्रवर्तकांसाठी १७० कोटींची तरतूद...१ जुलैपासून मिळणार वाढीव मानधन!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत राज्यातील ७२ हजार आशा स्वयंसेविकांना दरमहा दोन हजार आणि साडेतीन हजार गटप्रवर्तकांना तीन हजार रुपयांचा मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबत आदेश आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (ता. १७) काढला. मोबदल्याची वाढ १ जुलैपासून दिली जाईल. त्यासाठी सरकारने १७० कोटींची तरतूद केली आहे.

एक जुलैपासून मिळणार वाढीव मानधन

केंद्राच्या सूचनांनुसार ७८ पैकी नियमित चार कामांसाठी आशा स्वयंसेविकां च्या मोबदल्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून वाढ केली आहे. कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना केंद्र सरकार दोन हजार रुपये मानधन व कामाचा मोबदला वेगळा देते. गटप्रवर्तकांना प्रवासभत्ता दिला जातो. त्यामुळे मानधनवाढीच्या मागणीसाठी २०१९ मध्ये १५ दिवस संप झाला होता. त्याची दखल घेतली नाही. ३ जुलै २०२० पासून आयटकसह सर्वच सहा आशा संघटना एकत्र येऊन संपाची हाक दिली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने मानधनवाढीचा निर्णय घेतला. सरकारने सर्वेक्षणाचा मोबदला रोज ३०० रुपये आशा व गटप्रवर्तकांना द्यावा. संरक्षण साहित्य मोठ्या प्रमाणात द्यावे.

आशा व गटप्रवर्तकांच्या कामाची दखल घ्यावी

सर्वेक्षणासाठी गावपातळीवर करण्यात आलेली कोरोना आपत्ती निवारण समितीतील सर्वांनी मदत करावी. आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन २१ हजार रुपये दरमहा मिळावे, अशी अपेक्षा आहे. आशा व गटप्रवर्तकांच्या कामाची दखल सरकारने घ्यावी, असे आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे यांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT