RTE Admission  esakal
नाशिक

RTE Admission : दिंडोरी तालुक्यात आरटीईअंतर्गत प्रवेशप्रकिया सुरू; जाणुन घ्या तपशील

सकाळ वृत्तसेवा

दिंडोरी (जि. नाशिक) : आरटीईअंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी स्वयंअर्थसाहाय्यित व विनाअनुदानित दिंडोरी तालुक्यातील २५ शाळांमध्ये एकूण २६५ जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला. पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज व शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी केले.

१ मार्चपासून दिंडोरी तालुक्यातील खासगी शाळातील ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला असून https://rte25admission. maharashtra.gov. in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची असून, लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. (RTE admission process started in Dindori taluka nashik news)

शाळांची नावे अशी : आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल, जवळके दिंडोरी (६), किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, मानोरी (६), निक्स इंग्लिश मीडियम स्कूल, उमराळे बुद्रुक (६), आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, वणी (१२), संताजी इंग्लिश मीडियम स्कूल, वणी (७), ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, ढकांबे (३४), ग्लोबल पब्लिक स्कूल, ढकांबे (३),

आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, दिंडोरी (१३), अभिनव बालविकास मंदिर, दिंडोरी (१४), बालभारती पब्लिक स्कूल, दिंडोरी (इंग्रजी माध्यम १५), निर्मिती इंग्लिश मीडियम स्कूल, कोराटे (२२), अभिनव बालविकास मंदिर, निळवंडी (५), अभिनव बालविकास मंदिर, खेडगाव (१७), स्वर्गीय उषाताई इंग्लिश मीडियम स्कूल, लखमापूर (११),

अभिनव बालविकास मंदिर, करंजवण (४), कादवा इंग्लिश मीडियम स्कूल, राजारामनगर (८), अभिनव बालविकास मंदिर, मोहाडी (१७), अभिनव बालविकास मंदिर, कोऱ्हाटे (४), ऋषीलँड इंग्लिश मीडियम स्कूल करंजी (४),

उत्कर्ष पब्लिक स्कूल, ढकांबे (४), ज्युपिटर इंग्लिश स्कूल, दिंडोरी (१), उड्डाण इंग्लिश स्कूल, दिंडोरी (७), गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, दिंडोरी (१५),

बालभारती स्कूल, दिंडोरी (७), अभिनव बालविकास मंदिर, वरखेडा (२१). पात्र लाभार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज व विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT