school students.jpg 
नाशिक

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार ही अफवाच! 

दत्ता जाधव

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या शाळा बंद करण्याचे कोणतेही नियोजन नाही. याबाबत चुकीचा संदेश पसरत असून, ही केवळ अफवाच असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण 
जिल्ह्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या तब्बल ३०२ शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शेजारील शाळांमध्ये सामावून घेण्याचे नियोजन आहे. राज्याच्या शिक्षण विभागानेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार म्हसकर यांनी पत्राद्वारे जिल्हाभरातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत निर्देशित केले आहे. शाळा समायोजनाची ही प्रक्रिया सुरूही झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३०२, तर राज्यभरातील १५ हजार शाळा बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत संपर्क साधला असता म्हसकर म्हणाले, की शाळा बंद करण्यात येणार ही अफवा असून, याबाबत शिक्षकांत चुकीचा संदेश गेला आहे. कमी पटसंख्येच्या शाळांबाबत शासनाने केवळ माहिती मागविली असून, शिक्षकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT