leopard collage road.jpg 
नाशिक

बापरे! "तो नक्की बिबट्याच होता ना.. की भूत..?" वनविभाग अधिकारीही संभ्रमात 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वर्दळीचे ठिकाण असलेल्या कॉलेज रोड परिसरात महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी शुक्रवारी (ता. 29) सकाळी नऊच्या सुमारास शहरात वाणव्यासारखी पसरली; परंतु जखमी महिलेसह अन्य कुठल्याही व्यक्‍तीने बिबट्याला पाहिले नाही? असे कसे शक्य आहे.

बिबट्याने हल्ला केला तर मग असं कसं कोणी नाही पाहिला?
शहरातील उच्चभ्रू अशा कॉलेज रोड परिसरातील विसे मळा, येवलेकर मळा भागात पायी चाललेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी शुक्रवारी सकाळी शहरात पसरली. जखमी महिलेला प्रारंभी खासगी रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाट वस्तीचा परिसर असल्याने वन विभागाने तातडीने बिबट्याचा शोध घेण्यास सुरवात केली. गोखले एज्युकेशन सोसायटी प्रांगण व अन्य विविध ठिकाणी बिबट्याचा शोध सुरू होता; परंतु बिबट्याच्या पायाचे ठसे किंवा अन्य कुठलाही ठोस पुरावा आढळला नाही. त्यामुळे कॉलेज रोडला बिबट्या असल्याची केवळ अफवा असल्याचा निष्कर्ष सायंकाळी उशिरा वन विभागाने काढला. वन विभागाने पोलिस दलाच्या मदतीसह संपूर्ण परिसर पिंजून काढला. दुसरीकडे शहरात अफवांना ऊत आला होता. ठोस पुरावे न आढळल्याने बिबट्या नसल्याच्या निष्कर्षाप्रत वन विभाग पोचला होता. 

चक्‍क महिलेनेही बिबट्याला पाहिले नाही 
या हल्ल्यात श्रीमती रणबावळे जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांनीही बिबट्याला पाहिले नसल्याचे वन विभागाला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. "माझ्या अंगावर काहीतरी जोरदार पडले व त्यात मी खाली पडल्याचे' त्यांनी सांगितले. बिबट्याला पाहिले असल्याचा अन्य कुठलाही साक्षीदार आढळला नाही. दुसरीकडे महिलेच्या गळ्याजवळ खरचटले असून, पडल्यामुळे हाडाला जबर मार लागल्याचे बोलले जात आहे. 

बिबट्या दिसला नसल्याचे जबाबात
संबंधित महिलेच्या डोक्‍यास मुकामार लागला असून, गंभीर जखमा नाहीत. तसेच बिबट्या दिसला नसल्याचे त्यांनी जबाबात सांगितले आहे. वन विभागातर्फे कॉलेज रोड, येवलेकर मळा, विसे मळा परिसर पिंजून काढल्यानंतर बिबट्याचा वावर आढळला नाही. सीसीटीव्ही फुटेज, तसेच ड्रोनद्वारेही शोध घेतला. - विवेक भदाणे, वनक्षेत्रपाल, नाशिक पश्‍चिम वन विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT