satana bajar 2.jpg 
नाशिक

अचानक बाजारात खळबळ माजली..जेव्हा ऍपवरून कोरोनाबाधित रुग्णांचे संकेत मिळाले!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सटाणा : येथील बाजार समितीच्या आवारात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे वृत्त गुरुवारी (ता. 30) सायंकाळी सटाणा शहरात सोशल मीडियावरून पसरताच प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. केंद्र सरकारच्या "आरोग्य सेतू' ऍपवर सटाणा बाजार समिती आवारात कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याच्या अफवेने प्रशासनाने सायंकाळी सातच्या सुमारास बाजार समितीतील 80 हून अधिक कामगारांची तपासणी सुरू केली. प्रशासनाने बाजार समिती परिसर सील केला. 

प्रशासनाची तारांबळ; बाजार समितीतील 80 हून अधिक कामगारांची तपासणी 
दरम्यान, ऍपच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून खातरजमा करण्यासाठी प्रशासनावर नाहक उठाठेव करण्याची वेळ आली. आरोग्य सेतू ऍपवर कोरोनाबाधित रुग्ण सटाणा शहराच्या एक किलोमीटर परिसरात असल्याचे संकेत मिळाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. सायंकाळी पाचपासून ऍपच्या जीपीएसद्वारे शोध घेतला असता, बाजार समिती परिसर दिसत असल्याने प्रशासनाने बाजार समिती सील करून सर्व व्यापाऱ्यांना बाहेर काढले. कामगार, हमालांना सामाजिक अंतर जोपासत एकत्रित बसविले. 

सोशल मीडियावर अनेक संदेश धडधडू लागले
प्रांताधिकारी विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार अहिरराव यांनी हमाल, मापारी व मजुरांची तपासणी केली. तालुका आरोग्यपथकाने 80 हून अधिक कामगारांना ताप, खोकला आहे किंवा नाही याच्या तपासणीसाठी स्कीनिंग सुरू केले. बाजार समितीतून आत व बाहेर येण्यास मज्जाव करण्यात आला. प्रशासनाच्या धावपळीमुळे कोरोनाच्या अफवांना जोर चढल्याने शहरात सायंकाळी शुकशुकाट पसरला. या प्रकाराने सोशल मीडियावर अनेक संदेश धडधडू लागले होते. 

अफवांवर विश्‍वास ठेवू नये व प्रशासनास सहकार्य करावे
बाजार समिती परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची अफवा असली, तरी तपासणी अहवाल आल्याशिवाय कोरोनाचा रुग्ण असल्याचे निश्‍चित करणे शक्‍य नाही. कुणीही घाबरून न जाता सोशल मीडियावरील अफवांवर विश्‍वास ठेवू नये व प्रशासनास सहकार्य करावे. - जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदार, बागलाण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT